Tej Pratap Yadav seen in a video call with Akhilesh Yadav amid speculations of joining the Samajwadi Party after being expelled from RJD by father Lalu Prasad Yadav sarkarnama
देश

Tej Pratap Yadav - लालूंनी ‘राजद’मधून बाहेर काढलेले तेजप्रताप यादव आता ‘सपा’मध्ये जाणार?

Tej Pratap Yadav Video Call with Akhilesh Yadav - अखिलेश यादव यांच्याशी दोन व्हिडिओ कॉलवर बोलणं झाल्याने , राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Mayur Ratnaparkhe

Will Tej Pratap Join Samajwadi Party? - अनुष्का यादवशी संबंध उघड झाल्यानंतर राष्ट्रीय जनता दल आणि लालूंच्या कुटुंबातून बाहेर पडावं लागलेल्या तेजप्रताप यादव यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. लालू प्रसाद यादव यांनी राजदमधून बाहेर काढल्यानंतर आता तेजप्रताप यादव नवी राजकीय इनिंग सुरू करणार असल्याचं बोललं जात आहे. याला कारणही तसंच आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी तेजप्रताप यादव यांचा एकदा नव्हे तर दोनदा व्हिडिओ कॉल झाला आहे. एवढंच नाहीतर खुद्द अखिलेश यादव यांनीच तेजप्रताप यादव यांना कोणत्या जागेवरून लढणार अशी खुली ऑफरच दिली आहे.

यामुळे आता तेजप्रताप यादव हे समाजावादी पार्टीत लवकरच प्रवेश करतील आणि आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढवतील, अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.  राजदमधून बाहेर काढल्यानंतर तेजप्रताप यादव सातत्याने त्यांच्या समर्थकांसोबत बैठका करत आहेत. यासंदर्भातच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबत पोस्ट केली होती. ज्यात ते म्हणाले होते की, ‘’बैठकांचा दौरा सुरू आहे, जर जनतेचे प्रेम तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत आणि अडचणीला पूर्ण धैर्याने तोंड देण्याची एक वेगळीच शक्ती मिळते.’’

दरम्यान, अखिलेश यादव यांच्याशी झालेल्या व्हिडिओ कॉलबाबत खुद्द तेजप्रताप यादव यांनीच माहिती दिली आहे. तेजप्रताप म्हणाले, ‘’आज मी माझ्या कुटुंबातील सर्वात प्रिय सदस्यांपैकी एक असलेले उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी व्हिडिओ कॉलवर प्रदीर्घ चर्चा केली.  या दरम्यान बिहारच्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाली. अखिलेश हे नेहमीच माझ्या मनाच्या खूप जवळचे राहिलेले आहेत आणि आज जेव्हा त्यांनी अचानक माझी विचारपूस करण्यासाठी फोन केला, तेव्हा असे वाटले की जणू काही मी या लढाईत एकटा नाही.‘’

तर व्हिडिओ कॉलवरच चर्चेदरम्यान अखिलेश यादव यांनी तेजप्रताप यादव यांना थेट विचारले की, तुम्ही कुठून निवडणूक लढवणार आहात? यावर तेजप्रताप यांनी मी अद्याप याबाबत निर्णय घेतला नसल्याचं सांगितलं. तर निवडणूक लढवण्याधी ते लखनऊला येतील आणि त्यांना भेटतील, असंही तेजप्रताप म्हणाले आहेत.

व्हिडिओ कॉलवरील संभाषणादरम्यान, अखिलेश यादव तेज प्रताप यादव यांना विचारत आहेत की ते कुठून निवडणूक लढवणार आहेत. यावर तेज प्रताप यादव म्हणतात की त्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. तेज प्रताप म्हणतात की निवडणूक लढवण्यापूर्वी ते लखनऊला येतील आणि त्यांना भेटतील. ते असेही म्हणतात की जेव्हा ते लखनऊला जातील तेव्हा ते त्यांना दोन-तीन दिवस आधी कळवतील. या व्हिडिओ कॉल संभाषणादरम्यान, अखिलेश यादव तेज प्रताप यादव यांना सपा अधिकाऱ्यांना भेटायला सांगतानाही दिसत आहेत. तसेच, असंही सांगत आहे की ते जेव्हा लखनऊला जातील, तेव्हा दोन ते तीन दिवस आधी त्यांना कळवतील. याच व्हिडिओ कॉल दरम्यान अखिलेश यादव तेजप्रताप यादव यांना समाजवादी पार्टीच्या अन्य पदाधिकाऱ्यांशी ओळख परिचय करताना दिसत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT