Hyderabad News: देशातील पाच राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी मोठमोठ्या सभा घेण्यात व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हैदराबादच्या दौऱ्यावर होते. पण याच वेळी एक धक्कादायक घटना घडली.
पंतप्रधान मोदी सभेला संबोधित करत असताना एक मुलगी थेट लाईटच्या टॉवरवरच चढली, त्यामुळे काही वेळ सभेस्थळी मोठा गोंधळ उडाला. पंतप्रधान मोदींनी त्या मुलीला लाईटच्या टॉवरवरून खाली उतरवण्यासाठी विनंती केली. मात्र, त्या मुलीने ऐकले नाही. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं ?
नरेंद्र मोदी यांची सभा सुरु असतानाच एक मुलगी थेट लाईटच्या टॉवरवर चढली, त्यामुळे सभेला उपस्थित असलेल्या सर्वांचेच लक्ष तिच्याकडे गेले, त्यामुळे काही वेळ मोठा गोंधळ उडाला. यावेळी त्या तरुणीने जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर मोदींनी तिला खाली उतरण्यासाठी विनंती केली. पण मुलीने काही ऐकेले नाही.
यानंतर मोदींनी तिला विनंती करत "बेटा तू खाली ये…, बेटा हे बरोबर नाही…, आम्ही तुझ्यासोबत आहोत. मी तुझं म्हणणं ऐकतो, पण तू खाली ये, तिथे शॉर्ट सर्किट आहे, तू खाली ये...", अशी अनेकदा विनंती केली. अनेदका विनंती केल्यानंतर अखेर ती मुलगी टॉवरच्या खाली उतरली. यानंतर मोदी त्या मुलीला थँक्यू म्हणाले.
दरम्यान, सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मात्र, ती मुलगी लाईटच्या टॉवरवर नेमकं का चढली होती ? तीची नेमकी मागणी काय होती, सभेनंतर मोदींनी त्या मुलीची मागणी ऐकली का ? यासंदर्भातील सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Edited by : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.