Revanth Reddy Sarkarnama
देश

Revanth Reddy Lost : रेवंथ रेड्डींचा कोडंगलमधून मोठा विजय; तर कामारेड्डीतून पराभव

Telangana Assembly Election : आमदार सुरक्षितस्थळी नेण्याची तयारी

Sunil Balasaheb Dhumal

Telangana Election 2023 : तेलंगणात बीआरएसला धूळ चारत काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला. यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांनी जिवाचे रान केले. त्यांचा कोडंगलमधून विजय झाला तर कामारेड्डी मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. येथून त्यांनी थेट मुख्यमंत्री केसीआर यांना आव्हान दिले होते. कामारेड्डीतून भाजपचे कटपल्ली वेंकट रमण्णा रेड्डी यांचा विजयी झाले.

कोडगंल मतदारसंघातून रेवंथ रेड्डींना एक लाख सात हजार ४२९ मते मिळाले आहेत. त्यांनी बीआरएसच्या उमेदवाराचा ३२ हजार ५३२ मतांनी पराभव केला. तर कामारेड्डी मतदारसंघातूना भाजपचे कटपल्ली वेंकट रमण्णा रेड्डींना ६६ हजार ६५२ मते मिळाली. त्यांनी दुसऱ्या स्थानावरील केसीआर यांचा सहा ७४६ मतांनी पराभव केला, तर तिसऱ्या स्थानावरील रेवंथ रेड्डींपेक्षा ११ हजार ७३६ मते जास्त मते घेतली. राज्याचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांचा पराभव केल्याने कटपल्ली रेड्डी जायंट किलर ठरले आहेत.

तेलंगणात काँग्रसला ६४ जागा मिळाल्या आहेत, तर सत्ताधारी बीआरएस पक्ष ३९ जागा मिळवत दुसऱ्या स्थानावर आहे. भाजपला अपेक्षाहून अधिक आठ जागा मिळाल्या आहेत, तर एआयएमआयएमने सात जागा पटकावत राज्यातील आपले स्थान कायम ठेवले आहे. काँग्रेसला सत्तेची खुर्ची मिळवून देण्यात रेवंथ रेड्डींनी जिवाचे रान केले. त्यांना एका मतदारसंघातून पराभव तर एका मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात काँग्रेसच्या सुगीचे दिवस मिळवून देणारे रेवंथ रेड्डी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, बहुमतापेक्षा चार जागा जास्त मिळवेल्या काँग्रेसला घोडा बाजार होण्याची धोका टाळण्यासाठी राज्यातील आपल्या आमदारांना सुरक्षित स्थाळी हलवण्याचे नियोजन केले आहे. तसेच आठवडाभरातच राज्यात सत्ता स्थापनेचा दावाही काँग्रेसने केलेला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT