K Kavitha  Sarkarnama
देश

Delhi Liquor Scam: दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीला ईडीचे समन्स

Ganesh Thombare

Delhi News: तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या मुलीला ईडीने दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात समन्स बजावले आहेत. त्यामुळे दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची मुलगी आणि 'बीआरएस'च्या आमदार के.कविता यांना ईडीने नोटीस बजावली असून शुक्रवारी ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आमदार के.कविता यांची 'सीबीआय'ने देखील चौकशी केली होती. त्यानंतर ईडीकडून मार्च महिन्यातही आमदार के.कविता यांची चौकशी झाली होती. आता पुन्हा एकदा के.कविता यांना ईडीने समन्स बजावले आहे.

के.कविता यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे के.कविता या ईडी समोर शुक्रवारी चौकशीला हजर राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर याच प्रकरणात आणखी १२ पेक्षा जास्त लोकांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे.

दरम्यान, के.कविता यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणासंदर्भातील आरोप फेटाळले असून तेलंगणात पाय रोवण्यासाठी ईडीचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला. तसेच आपण काही चुकीचे केले नसल्याचा दावा के.कविता यांनी केला आहे.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT