Terrorist Attack
Terrorist Attack Sarkarnama
देश

पुलवामामध्ये चेकपोस्टवर दहशतवाद्यांचा हल्ला; सीअरपीएफचा जवान शहीद

सरकारनामा ब्यूरो

jammu Kashmir Terrorist Attack : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा (Pulwama) येथे रविवारी (ता.17 जुलै) दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाच्या तुकडीवर हल्ला करण्यात आला या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद (martyred) झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या (CRPF) जवानांकडून नाक्यावर तपासणी करण्यात येत होती. दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षादलावर हल्ला केला. ही घटना गोंगू क्रॉसिंग परिसरातील घडली आहे. (jammu Kashmir Terrorist Attack Latest Marathi News)

दहशतवाद्यांकडून अचानक हल्ला करण्यात आल्यावर सुरक्षा दलाकडून प्रत्युत्तर दिले गेले. तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिम सुरू असून सुरक्षा यंत्रणा अर्लट मोडवर आहेत. पुलवामा जिल्ह्यात गोंगू क्रॉसिंगजवळ सर्क्युलर रोडवर आज दुपारी पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांची संयुक्त तुकडी चेकपोस्टवर तैनात करण्यात आली होती. येथून ये-जा करणाऱ्या वाहनांची आणि चालकांची कसून चौकशी केली जात असतांना क्रॉसिंगजवळ एका सफरचंदाच्या बागेतून दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये सीरआरपीएफचे एएसआय विनोद कुमार गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हल्लेखोर दहशतवाद्यांना जेरबंद करण्यासाठी परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरू आहे.

दरम्यान, दहशतवादी संघटनांनी गेल्या चार वर्षांत कश्मीर खोऱ्यात अनेक तरुणांची भरती केली आहे. आजघडीला 141 सक्रिय दहशतवादी आहेत, त्यापैकी बरेच विदेशी असल्याचं सांगितल जात आहे. हे दहशतवादी प्रामुख्याने जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन याशिवाय लष्कर-ए-तैयबा, त्याची संलग्न संघटना द रेझिस्टन्स फ्रंट यासारख्या संघटनांतील असल्याच सांगितलं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT