Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News Sarkarnama
देश

Shivsena News : शिवसेनेची घटना कायद्याला धरूनच! सिब्बल यांचा महत्त्वाचा युक्तीवाद

सरकारनामा ब्यूरो

ShivSena News : खरी शिवसेना (Shivsena) कुणाची यावर आज (ता. 17) केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. आज ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. मागील सुनावणी वेळी शिंदे गटाच्या वतीने अँड. महेश जेठमलानी आणि अँड मनिंदर सिंह यांनी बाजू मांडली होती. आता थोड्याच वेळात सुनावणी सुरु होणार आहे. दोन्ही गटाचे वकिल आणि नेते आयोगात दाखल झाले आहेत.

ठाकरे गटाच्या वतीने खासदार अनिल देसाई उपस्थित आहेत. तर शिंदे गटाच्या वतीने खासदार राहुल शेवाळेही उपस्थित आहेत. दरम्यान, शिंदे गटाने बाजू मांडताना शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रित होती. तिच्यामध्ये बदल न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतले. परंतु त्यामुळे ते शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर बेकायदेशीररित्या अध्यक्ष झाल्याचा युक्तीवाद त्यांनी केला होता.

तसेच अँड मनिंदर सिंह यांनी शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना इलेक्शन सिम्बॉल ऑर्डरनुसार पक्ष चिन्ह कुणाचे हे ठरवावे. निवडणूक चिन्ह हे गरीब व अशिक्षित नागरिकांसाठी पक्षाची ओळख असते म्हणून अधिकृत राजकीय पक्षाला अधिकृत चिन्ह मिळते, असे म्हणाले होते. आज त्यावर सिब्बल हे बाजू मांडणार आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

16 आमदार

13 विधानपरिषद

05 लोकसभा खासदार

03 राज्यसभा खासदार

182 राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य

प्रतिज्ञापत्र 3 लाख (जिल्हा प्रमुख ते गटप्रमुख)

प्राथमिक सदस्य 20 लाख

एकूण कागदपत्र 23 लाख 182

बाळासाहेबांची शिवसेना

खासदार 13

आमदार 40

संघटनात्मक प्रतिनिधी 711

स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी-2046

प्राथमिक सदस्य 4,48,318

शिवसेना राज्यप्रमुख 11

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT