Thackeray Vs Shinde sarkarnama
देश

Thackeray Vs Shinde : मोठी बातमी : शिंदे गटाच्या सात जिल्हाप्रमुखांवर ठाकरेंचा आक्षेप ; आयोगावर समोर केला दावा!

Thackeray Vs Shinde : कागदपत्रांच्या बाबत आक्षेप घेत ठाकरे गटाने...

सरकारनामा ब्यूरो

Thackeray Vs Shinde : शिंदे गटाच्या सात जिल्हाप्रमुखांच्या नियुक्तिवर शिवसेना ठाकरे गटाने आज निवडणूक आयोगासमोर आक्षेप घेतला आहे. शिंदेच्या सात जिल्हाप्रमुखांच्या कागदपत्रांमध्ये त्रु़टी असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. असा दावा ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगासमोर केला आहे. आयोगासमोर धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याबाबत सुनावणी झाली. दोन्ही गटांच्या वतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या युक्तिवादादरम्यान हा आक्षेप घेण्यात आला आहे.

शिंदे गटाचे जे सात जिल्हाप्रमुख आहेत, असं शिंदे गटाने कागदपत्रांद्वारे आयोगासमोर सांगितलं आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय.या जिल्हाप्रमुखांच्या संदर्भात जे कागदपत्रे सादर केली गेली आहेत, त्यात त्रुटी असल्याचा दावा केला गेला आहे. नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले,अलिबागचे राजाभाई केणी, नंदुरबारचे राम रघुवंशी यांच्यासह इतर चार जिल्हाप्रमुखांवर आक्षेप घेण्यात आला आहे.

खरी शिवसेना (Shivsena) कुणाची यावर आज (ता. 17) केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली . आज ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. त्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी युक्तीवाद केला. आता निवडणूक आयोगात पुढील सुनावणी शुक्रवारी 20 जानेवारीला होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT