Thackeray Vs Shinde :
Thackeray Vs Shinde :  sarkarnama
देश

Thackeray Vs Shinde : प्रतिनिधी सभा ठाकरेंकडेच : ठाकरे गटाचा युक्तिवाद!

सरकारनामा ब्यूरो

Thackeray Vs Shinde : खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापैकी धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबतची महत्वाची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पार पडत आहे. दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. ठाकरे गटांकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल, विधिज्ञ देवदत्त कामत हे युक्तिवाद करत आहेत.

दरम्यान, आयोगासमोर युक्तिवाद करताना ठाकरे गटाचे कामत म्हणाले की, "शिवसेना पक्षाची प्रतिनिधी सभा ही ठाकरेंकडेच आहे, असं त्यांना अयोगासमोर म्हंटले आहे. सिब्बल यांनी प्रतिनिधी सभेची मु्द्दा मांडला होता. कामत असेही म्हणाले की, शिंदे गटाची प्रतिनिधी सभा बनवली गेली नाही."

दरम्यान, कपिल सिब्बल ठाकरे गटाकडून युक्तिवाद करताना म्हणाले की, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तावाद शिंदे गटाची प्रतिनिधी सभाच नाही. पक्ष सोडून गेलेले नेत प्रतिनिधी सभेचा भाग होऊच शकत नाही. घटनेनुसार प्रतिनिधी सभा ठाकरेंकडेच असतो. प्रतिनिधी सभेला पक्ष चालवण्याचा अधिकार असतो. शिंदे गटाने लोकशाहीनुसार म्हणणं मांडायला हवं होतं. राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाने कागदपत्रे सादर केली आहेत का? शिंदे गट हा राजकीय पक्ष होऊ शकत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT