Rahul Gandhi on Wrestler Jantar Mantar Protest : दिल्लीत जंतर-मंतरवर येथे मागील काही दिवसांपासून महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. दिल्ली पोलिसांकडून जंतर मंतर या ठिकाणीहून नव्या संसद भवनाकडे जाणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यात आले. येथील कुस्तीपटूंचा तंबूही हटवला. आता या सर्व घडामोडींवर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये राहुल गांधी म्हणतात. एक राज्याभिषेक पूर्ण झालं आहे. अहंकारी राजा रस्त्यावर प्रजेचा आवाज चिरडून टाकत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नव्या संसदेचं उद्घाटन पार पडलं. यावरून राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे नाव न घेता मोदींवर निशाणा साधला आहे.
नव्या संसदेच्या उद्धघाटन सोहळ्याला विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. तर नवीन संसद भवनासमोर आंदोलन करण्याच्या उद्देशाने निघालेल्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं आहे. या कारवाई दरम्यान कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापट यावेळी पोलीस - कुस्तीपटूंमध्ये राडा झाल्याचे देखील पाहायला मिळालं. पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची पोलिसांनी धरपकड केली. याचा सामाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. स्वत: राहुल गांधी यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.