Manish Sisodia Sarkarnama
देश

Manish Sisodia News: मनीष सिसोदियांना दिल्ली हायकोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळत केली महत्वाची टिप्पणी

Delhi High Court : मनीष सिसोदिया हे दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता

सरकारनामा ब्यूरो

Manish Sisodiya: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. कथित मद्य घोटाळा प्रकरणात जामीन मिळण्यासाठी सिसोदियांनी दिल्ली हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, सिसोदियांचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला आहे.

दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदिया यांना सीबीआयने २६ फेब्रुवारीला अटक केली होती. तेव्हापासून मनीष सिसोदिया तुरुंगात आहेत. त्यांनी जामीन मिळण्यासाठी कनिष्ठ न्यायालयातही अर्ज दाखल केला होता.

मात्र, कनिष्ठ न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला, पण दिल्ली हायकोर्टानेही त्यांना दिलासा दिला नाही.

सिसोदियांचा जामीन अर्ज फेटाळताना हायकोर्टाने महत्वाची टिप्पणी केली. सिसोदियांविरोधात गंभीर आरोप आहेत. या प्रकरणातील व्यवहारही योग्य नाही. ते साक्षीदारांना प्रभावित करू शकतात. त्यामुळे त्यांना जामीन दिला जाऊ शकत नाही, अशी टिप्पणी हायकोर्टाने केली.

दरम्यान, आता मनीष सिसोदिया हे दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत, अशी माहिती आम आदमी पक्षाकडून देण्यात आली. त्यामुळे आता सिसोदियांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळणार का? याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT