Election Commission, Supreme Court News Sarkarnama
देश

Shiv Sena News : निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल; केला मोठा दावा!

Supreme Court : केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Election Commission News : शिवसेना (Shivsena) नाव आणि पक्ष चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना देण्याचा निर्णय रास्त आणि कायद्यानुसारच होता, अशी भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात आयोगाने याबाबतची भूमिका स्पष्ट केली.

निवडणूक आयोगाने दाखल केलेल्या उत्तर म्हटले आहे, की ''आपल्या निवडणूक आयोग निष्पक्ष नसल्याचा उद्धव ठाकरे यांनी केलेला आरोप निराधार आहे, असेही म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय रास्त आणि कायद्यानुसार होता, असा दावा आयोगाने केला आहे.

हा निर्णय प्रशासकीय पातळीवर नव्हे तर घटनात्मक पातळीवर घेतला. नियमांनुसार अर्ध-न्यायिक संस्था म्हणून घेतलेला निर्णय व त्यामुळे या प्रकरणात निवडणूक आयोगाला पक्षकार बनवता येत नसल्याचेही, म्हटले आहे. या प्रकरणाच्या गुणवत्तेवर निवडणूक आयोगाला काहीही म्हणायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेतील मुद्दे...

उद्धव ठाकरेंनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या निर्णयाला आव्हान देताना ठाकरेंनी, आयोगाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. या याचिकेत ठाकरेंनी निवडणूक आयोगावर आरोपच केला आहे. तटस्थ लवाद म्हणून कर्तव्य बजावण्यात निवडणूक आयोग अपयशी ठरला असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने या प्रकरणात स्वतःच्या घटनात्मक दर्जाला धक्का पोहोचवला. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. आयोगाने दिलेल्या आदेशावर कोणतीही कार्यवाही केली जाऊ शकत नसल्याचेही म्हटले आहे. हे प्रकरण निवडणूक आयोग व न्यायालयात गुंतलेले आहे. जे आमदार अपात्रता कारवाईच्या सावटाखाली आहे, त्यांच्यावर आयोग विश्वास ठेवू शकत नाही. न्यायालयात प्रकरणाचा निकाल लागण्याआधीच आदेश काढण्याची चूक आयोगाने केली, असे ठाकरे गटाने आपल्या चिकेत म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT