Narendra Modi News:  Sarkarnama
देश

New Parliament: अधिनम संतांनी पंतप्रधान मोदींकडे सुपूर्द केला ऐतिहासिक राजदंड !

Narendra Modi News: नव्या संसद भवनात ठेवण्यात येणारा राजदंड नक्की काय आहे?

सरकारनामा ब्यूरो

Political News: देशाच्या नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा उद्या दि.28 मे 2023 रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वसंध्येलाच ऐतिहासिक सेंगोल अर्थात राजदंड महंतांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोपवण्यात आला आहे.

हा राजदंड तामिळ परंपरेनुसार रविवारी भारताच्या नव्या संसद भवनामध्ये स्थापित करण्यात येणार आहे. हा राजदंड 15 ऑगस्ट 1947 ला सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता.

या राजदंडला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. ब्रिटिशांनी ज्यावेळी भारतीयांकडे सत्ता हस्तांतरित केली. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरु यांनी हा राजदंड स्वीकारलं होतं. आता हा राजदंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

देशाच्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी हा राजदंड नव्या संसद भवनात स्थापित करण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून हा राजदंड पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यारडे सुपूर्द करण्यात आला होता.

15 ऑगस्ट 1947 ला भारताच्या स्वातंत्र्यदिनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे राजदंड सोपवण्यात आला होता. त्यानंतर आता 75 वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा राजदंड सुपूर्द करण्यात आला आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT