Modi government, Mehbooba mufti, Mehbooba mufti on The Kashmir files movie
Modi government, Mehbooba mufti, Mehbooba mufti on The Kashmir files movie sarkarnama
देश

काश्मीरी पंडितांच्या दुःखाला भाजप राजकीय रंग देतयं ; मेहबूबा मुफ्ती संतापल्या

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : 'द कश्मीर फाईल्स'या चित्रपटाने दोनशे कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पीडीपीच्या (PDP)अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी या चित्रपटावरुन मोदी सरकारवर टीका केली आहे.

''द कश्मीर फाईल्स' चित्रपट मी पाहिलेला नाही, पण मी छत्तीसिंहपुरा हत्याकांड, नंदी मार्ग हत्याकांड मी पाहिले आहे. लष्करांच्या जवानांनी सात मुस्लिम युवकांची हत्या केली ते मी पाहिले आहे,'' असे सांगत मेहबूबा मुफ्ती (Mehbooba mufti)यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या. (Mehbooba mufti on The Kashmir files movie)

''काश्मीरी पंडितांच्या हत्येबाबत भाजप अनभिज्ञ आहे. काश्मीरी पंडिताच्या दुःखाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. ते काश्मीर खोऱ्यात व्देष परविण्याचे काम करीत आहेत,'' असा आरोप त्यांनी केला.

''धर्माच्या नावावर मते मागण्याचे काम भाजपने थांबवावे. धर्माच्या नावावर जनतेमध्ये पुन्हा एकदा फूट पाडण्याचे काम सुरु आहे,'' असा आरोप महबूबा मुक्ती यांनी केला आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी पक्ष कार्यकत्यांशी यावेळी संवाद साधला. ''मोहमद अली जिन्ना यांनी देशाचे विभाजन केलं, पुन्हा धर्मांच्या नावावर आज विभाजन होण्याचा प्रयत्न काही राजकीय शक्ती करीत आहेत,'' असा आरोप त्यांनी यावेळी केला.

सध्या या चित्रपटाच्या बाजूचे आणि चित्रपटाच्या विरोधातले असे दोन गट पडले आहेत. बाजूचे हा चित्रपट सर्वांनी पाहावा यासाठी प्रचार करताहेत तर विरोधातले या चित्रपटावर बंदी आणावी, अशी मागणी करीत आहेत. समाजमाध्यमांवर या दोन्ही गटांमध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे. त्यावरुन राजकारण सुरु आहे.

हिंदू पंडितांच्या पलायनाच्या मुद्यावर तत्कालीन कॉंग्रेस सरकारने काश्मीरी हिंदूना वाळीत टाकलं असा आरोप भाजपने केला. काश्मीरी पंडितांच्या स्थलांतराबाबत वेगवेगळे दावे केले जातात, वेगवेगळी आकडेवाडी सांगितले जाते. या अत्याचाराची व्याप्ती किती खोल आहे, त्याची तीव्रता किती आहे. त्याला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT