Narendra Modi, Amit Shah Presidential election News Sarkarnama
देश

भाजपकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी 'या' महिला नेत्यांची नावं आघाडीवर

महिला या नवी व्होटबँक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार सांगत असतात.

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाकडून (BJP) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. याबाबत हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून ओबीसी किंवा महिला नेत्याला राष्ट्रपदीपदाचा उमेदवार (Presidential candidate) बनवले जाऊ शकतो.

देशातील ओबीसींची (OBC) आणि महिलांची संख्या बघता ही निवड केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याचबरोबर अनुसूचित जमाती, जाती तसेच दक्षिण भारतातील उमेदवार यासारखी समीकरणेही चर्चीले जात आहेत. याबाबतच्या शक्यतांची चाचपणी केली जात असून २०२४ च्या लोकसभा निवडणूक विचारात घेऊन उमेदवारांच्या नावाची घोषणा कली जाईल असेही बोलले जात आहे. (Presidential election News)

देशात ओबीसी समाजाची लोकसंख्या ही सुमारे ४० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याची कल्पना ही सर्वच राजकीय पक्षांना आहे. तर लोकसंख्येतील महिलांचा वाटाही निम्मा असल्याने महिला या नवी व्होटबँक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार सांगत असतात. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर प्रदेशपासून ते महाराष्ट्रापर्यंत जवळपास सर्व राज्यांमध्ये ओबीसींची संख्या लक्षणीय आहे. यामुळे भाजपच्या मित्रपक्ष जेडीयूसह सर्वच पक्षांनी ओबीसींचा विश्वास जिंकण्यासाठी जातीआधारित जनगणनेची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी ओबीसींना संधी दिल्यास भाजपला पुढील लोकसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो, असा अंदाज लावला जात आहे.

दरम्यान, सुत्राच्या माहितीनुसार महिला आणि ओबीसी या दोन्ही मतदारांचा आकर्षित करण्यासाठी ओबीसी महिला उमेदवारास संधी देऊन दोन्ही मतदारांना संधी मिळू शकते. या पदासाठी काही नावांची चर्चाही होत असून या नावामध्ये तामिळनाडूच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन, छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुया उईके, झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू आणि केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचं नावही संभाव्य राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी समोर येत आहेत. मात्र, भाजपकडून कुठल्या नावाला दुजोरा मिळतो की ऐनवेळी कुठल्या नवीन नावाला पंसती दिली जाते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT