Ayodhya Ram Mandir:
Ayodhya Ram Mandir: Sarkarnama
देश

Ayodhya Ram Mandir: 'त्या' मशिदीतील खांब हिंदू संस्कृतीचे... पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. मोहम्मद यांची माहिती

सरकारनामा ब्युरो

Ayodhya Ram Mandir: बाबरी मशिदीच्या उत्खननादरम्यान हिंदू संस्कृतीच्या चिन्हांचे अनेक खांब आढळून आले आहेत. अशा परिस्थिती मशिदीच्या आधी तिथे मंदिर होते असा अंदाज लावता येतो, अशी माहिती पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. मोहम्मद यांनी दिली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे. (Ayodhya Ram Mandir News)

यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिरात सापडलेल्या हिंदू स्तंभांबाबतही चर्चा केली आणि मशिदीत मंदिर असल्याचा पुरावा कसा मिळाला ते सांगितले. के.के मोहम्मद म्हणाले की, 1976 ते 1977 दरम्यान मी पहिल्यांदा अयोध्येला गेलो होतो, माझे पुरातत्वशास्त्राचे पहिले प्रशिक्षण तिथेच झाले.

“जेव्हा पुरातत्व विभागाची टीम उत्खननासाठी आत जाते, तेव्हा सर्वात आधी आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली जाते. त्यानंतर एखाद्या भागात आपल्याला काही मिळू शकते, याचा अंदाज घेऊन या भागात उत्खनन केले जाते. 1976-77 मध्ये तंत्रज्ञानाचा एवढा विकास झाला नव्हता.आम्ही मशिदीत (Babri Masjid) गेलो होतो, पण त्याचे कुलूप बंद होते आणि तिथे एक पोलीस उभा होता. त्या काळात हा इतका मोठा प्रश्न नव्हता. आम्ही संशोधनासाठी आल्याचे त्यांना सांगितलं आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याने आम्हाला आत जाण्याची परवानगीही दिली. (National Political News)

“आम्ही आत गेलो तेव्हा आम्ही पाहिले की मशिदीचे सर्व खांब हे मंदिराचे खांब आहेत.या मशिदीचे खांब नाहीत तर हे मंदिराचे आहेत. त्यावेळी तेथे 12 खांब आढळून आले. हे कसं कळलं. ते 12व्या शतकातील मंदिरांचे खांब आहे की 15व्या शतकातील आहे हे बघूनच कळू शकते. याचा अर्थ पुरातत्वशास्त्रज्ञ इमारतीच्या बांधकाम शैलीवरून ती कोणत्या कालखंडातील आहे हे शोधू शकतो.आम्ही याला शैलीगत रेटिंग म्हणतो, असंही यावेळी के.के. मोहम्मद यांनी यावेळी सांगितलं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT