Reason behind the train accident in Odisha :  Sarkarnama
देश

Odisha Train Accident: रेल्वेमंत्र्यांच्या मोठा खुलासा: कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघाताचं खरं कारण आलं समोर

National News: आज सकाळी अश्विनी वैष्णव यांनी पुन्हा एकदा अपघाताच्या ठिकाणी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

सरकारनामा ब्यूरो

Reason behind the train accident in Odisha : ओडिशातील बालासोर रेल्वे दुर्घटनेवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठे वक्तव्य केले आहे. रेल्वे अपघाताचे खरे कारण कळले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अपघाताचे खरे कारण कळले असून सुरक्षा आयुक्त लवकरच अपघातासंबंधीचा आपला अहवाल पाठवतील, असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. (The real reason behind the train accident in Odisha has come to light)

आज सकाळी अश्विनी वैष्णव यांनी पुन्हा एकदा अपघाताच्या ठिकाणी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी एएनआय शी बोलतान ना वैष्णव म्हणाले की, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची संपुर्ण चौकशी केली आहे. अपघाताचे कारण शोधून काढण्यात आले असून जबाबदारांची ओळख पटवण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलांमुळे हा अपघात झाल्याचं अहवालातून समोर आलं आहे

तसेच, पंतप्रधानांनी दिलेल्या निर्देशानुसार काम वेगाने सुरू आहे काल रात्री ट्रॅकचे काम जवळजवळ पूर्ण झाले. आज एक ट्रॅक पूर्णपणे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. अपघात झालेले सर्व डबे हटवण्यात आले आहेत. तसेच, मृतदेहही बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरु आहे. बुधवारी सकाळपर्यंत संपुर्ण मार्ग पुर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे रेल्वे ट्रॅकची दुरुस्तीही वेगाने सुरु आहे. सुमारे एक हजार मजूर यासाठी काम करत आहेत. कोणी रेल्वे रुळ दुरुस्त करत आहेत तर कोणी ढिगार हटवत आहेत. ५ जूनपर्यंत संपुर्ण ट्रॅक पुर्ववत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांनीही या अपघातासंबंधी काही प्रश्न उपस्थित केले होते. कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये टक्करविरोधी यंत्रणा बसवण्यात आली नव्हती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच, मी रेल्वेमंत्री असताना ट्रेनमध्ये टक्करविरोधी यंत्रणा बसवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रणालीमुळे एकाच ट्रॅकवर धावणाऱ्या गाड्या ठराविक अंतरावर थांबत असत. पण या ट्रेनमध्ये अशी कोणतीही यंत्रणा का बसवण्यात आली नव्हती. अशा तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमुळे ही घटना टाळता आली असती, असंही त्यांनी म्हटलं होतं.

यावरही अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आरोपांनाही उत्तर दिलं आहे. " ममता बॅनर्जी कवच पद्धतीसंबंधी बोलल्या. मात्र अपघाताचे कारण काही वेगळेच होते. ममता बॅनर्जी जे म्हणाल्या ते कारण नव्हते. ममता बॅनर्जी 1999 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारमध्ये रेल्वे मंत्री बनल्या.

Edited By-

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT