Bharat Jodo Yatra 2.0 : काँग्रेसने भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा २ ऑक्टोबर पासून सुरू होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर काँग्रेसने दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2024 च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी गुजरात ते अरुणाचल प्रदेशात असा या यात्रेचा दुसरा टप्पा असेल. (The second phase of Congress's 'Bharat Jodo Yatra' will begin on this day; Such is the strategy)
- असा होता पहिला टप्पा
राहुल गांधींनी 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू केली होती, जी 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये संपला, परंतु त्यापूर्वी यात्रेला मिळालेल्या पाठिंब्यामुळे प्रोत्साहित झालेल्या काँग्रेसने दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे भारताचा दौरा करणाऱ्या राहुल गांधींनी आता पश्चिमेकडून पूर्वेकडे असाच प्रवास करायचा का, अशी चर्चा पक्षात सुरू झाली आहे.
गुजरातमधून सुरु होणार यात्रा
गुजरातमधील पोरबंदर किंवा साबरमती आश्रमापासून ही यात्रा सुरू होईल. हा प्रवास सुमारे 3100 किमी हा प्रवास असेल.भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा 3570 किमीचा होता.तर अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंड येथे यात्रेची सांगता होऊ शकते. दुसऱ्या टप्प्यातील प्रवासासाठी 140 ते 150 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. पण काँग्रेसमध्ये अजूनही यासंदरर्भात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तसेच,तारीखही अद्याप निश्चित झालेली नाही. (Congress News)
दुसऱ्या टप्प्यासाठी रणनीती
भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात ज्या पद्धतीने सर्वसामान्य जनता राहुल गांधींशी (Rahul Gandhi) जोडली गेली, त्यानंतरच यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची चर्चा सुरू झाली आणि आता त्याची रणनीतीही तयार केली जात आहे. 2024 च्या निवडणुकीपूर्वी भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्याची गती कायम ठेवायची असेल, तर दुसऱ्या टप्प्यात या पाठिंब्याचे मतांमध्ये रूपांतर व्हायला हवे, असा काँग्रेसचा मानस आहे.
राहुल गांधीही भारत जोडो यात्रेत अतिशय तन्मयतेने गुंतले होते. ब्रेकच्या काळात राहुल गांधी यात्रा सोडून परदेशात निघून गेल्याचा दावा केला होता, पण दिल्लीतच राहुल राहुल गांधींन भाजपचा हा दावा धुडकावून लावला. या यात्रेचा दुसरा टप्पा म्हणजे राहुल गांधी यांच्या मेहनतीचे निवडणुकीतील यशात रूपांतर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.