Modi and Nitish Kumar Sarkarnama
देश

BJP Victory effect on Bihar Election : दिल्ली निवडणुकीतील भाजपच्या प्रचंड विजयाचे वादळ बिहारमधील महाआघाडीलाही उडवून लावेल?

BJP, NDA Focus on Bihar : तेव्हाच स्पष्ट झाले की दिल्ली काबीज केल्यानंतर आता भाजप व एनडीएचे आगामी लक्ष्य बिहार विधानसभा निवडणूक आहे.

Mayur Ratnaparkhe

NDA and Bihar Vidhan sabha Election : दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर जेव्हा भाजप मुख्यालयात पंतप्रधान मोदी अतिशय आनंदाने पोहचले आणि आपल्या मार्गदर्शनातून भाजप कार्यकर्त्यांमध्येही आणखी जोश व उत्साह निर्माण केला. तसेच दिल्लीतील जनतेचे आभार व्यक्त कले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मोदींनी आपल्या भाषणात बिहारचा उल्लेख करत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विकासकामांचा उल्लेख केला. तेव्हाच स्पष्ट झाले की दिल्ली काबीज केल्यानंतर आता भाजप व एनडीएचे आगामी लक्ष बिहार विधानसभा निवडणूक आहे.

याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित करत म्हटले की, जर आठवा की नितीशकुमार येण्याआधी बिहारची कारय परिस्थिती होती. बिहारमध्ये बदल तेव्हाच घडला जेव्हा नितीशकुमार(Nitishkumar) बिहारचे मुख्यमंत्री झाले आणि जेव्हा एनडीएचे सरकार बनले. तसेच मोदींनी यावेळी सांगितले की एनडीए म्हणजे विकासाची गॅरंटी, सुशासनाची गॅरंटी. त्यामुळे एकप्रकारे जाहीर संकेत मिळाले आहेत की, बिहार निवडणूक जिंकण्यासाठी भाजप कोणतीही कसर सोडणार नाही.

राजकीय जानकार सांगतात की, दिल्ली विधानसभा निवडणूक केवळ एका राज्यापुरती निवडणूक नव्हती, तर भाजपसाठी(BJP) तो प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता. दिल्लीतील विजयानंतर मोदींच्या चेहऱ्यावरील आनंद सगळं काही सांगत होता. विशेष म्हणजे अडीच दशकानंतर प्रचंड मताधिक्याने भाजप सत्तेवर आला आहे. भाजपच्या या विजयामुळे एनडीए आघाडीतील मित्र पक्षातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंतप्रधान मोदींनी(PM Modi) या प्रचंड विजयासाठी पूर्वांचलमधील जनतेचे विशेषत: एनडीए नेत्यांचे आभार व्यक्त केल्यावरून, दिसते की एनडीएचे नेते या कौतुकाच्या माध्यमातून बिहारचे राजकारण आणि तेथील मतदारांना मोठा मेसेज देत आहेत. दिल्लीतील विजयानंतर भाजपचा उत्साह कमालीचा शिगेला पोहचला आहे आणि याचा थेट परिणाम बिहार निवडणुकीवर होणार असल्याचे स्पष्ट आहे.

एनडीए नेत्यांचे मत आहे की, जेव्हा डबल इंजिन सरकारचे फायदे दिल्लीतील जनतेने समजून घेतले आणि अरविंद केजरीवाल सारख्या मातब्बर नेत्याला पराभूत केलं. तर मग याचे फायदे सांगून बिहारमधील जनतेला डबल इंजिन सरकारसाठी मतदान करण्यास तयार केलं जावू शकतं. दिल्लीत 27 वर्षानंतर भाजपच्या विजयावर बिहारमधील प्रमुख नेते जीतन राम मांझी यांनी म्हटले होते की दिल्ली त झांकी है, बिहार अभी बाकी आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT