Russia-Ukraine War
Russia-Ukraine War sarkarnama
देश

Ukraine पडला एकाकी; अमेरिका युद्धभूमीवर सैन्य पाठवणार नाही..

सरकारनामा ब्यूरो

वॉशिंग्टन : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर (Russia-Ukraine War) काही तासांतच अमेरिकेने त्यांच्यावर नवे निर्बंध लादले आहेत. रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी हे निर्बंध लादण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (joe Biden) यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार काल रात्री (ता. 24 फेब्रुवारी ) जी-७ देशांच्या (G-7) नेत्यांशी रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाबद्दल चर्चा केली. त्यानंतर व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेऊन नव्या निर्बंधांची घोषणा केली. बायडेन म्हणाले, "संपूर्ण जग रशियाच्या विरुद्ध एकवटले आहे. युरोपिय समुदायातील ३० पैकी २७ देश आणि जी-७ राष्ट्रे रशियाविरुद्ध एकत्रितपणे निर्बंध लागू करणार आहेत.

रशियाने अमेरिकेवर सायबर हल्ला केला, तर त्याला उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत, असेही बायडेन यांनी यावेळी स्पष्ट केले. "कोणत्याही कारणाशिवाय रशियाने युद्ध सुरू केले आहे. या काळात आम्ही युक्रेनच्या जनतेसोबत आहोत," असे सांगतानाच युक्रेनच्या मदतीसाठी युद्धभूमीवर सैन्य पाठविण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा करण्यात येणार नाही. आधीचा सोव्हिएट रशिया त्यांना पुन्हा निर्माण करायचा आहे. त्यांची ही महत्त्वाकांक्षा इतर देशांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारी आहे, असेही बायडेन म्हणाले. भारत हा अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातील सहकारी आहे. रशिया-युक्रेन यांच्या युद्धात भारत अमेरिकेला साथ देणार का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत बायडेन यांना विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले, "आम्ही भारताच्या संपर्कात असून, याबाबतची चर्चा अद्याप झालेली नाही, असे उत्तर बायडेन यांनी दिले. (Russia-Ukraine War News updates)

असे असतील निर्बंध..

  • .रशियाच्या चार मोठ्या बँकांची संपत्ती गोठविणार. या बँकांची एकूण संपत्ती एक ट्रिलियन डॉलरवर आहे

  • डॉलर, युरो, पाऊंड आणि येन या चलनांत रशियाला कोणाशीही व्यवहार करता येणार नाहीत.

  • रशियाला जगभरातून मिळणारी लष्करी व आर्थिक मदत रोखणार निर्यातीवरही निर्बंध लागू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT