Mallikarjun Kharge News : काँग्रेसला बुधवारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रुपाने 24 वर्षात पहिला गैर-गांधी अध्यक्ष मिळाला आहे. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी खासदार शशी थरूर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. मात्र, खर्गे यांचा मार्ग सोपा नाही, कारण गेल्या काही वर्षात पक्षाचा बहुतांश निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे. अनेक ज्येष्ठ नेतेही पक्ष सोडून गेले आहेत. बंडखोरीचे आवाज अधून मधून ऐकू येत असतात.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारशी लढण्यासाठी काँग्रेसला महाआघाडीत सामावून घेण्यासाठी विरोधी पक्षही टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमोर मोठी आव्हाने असणार आहेत.
1) मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यापुढे आता सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची पक्षात कशी आणि काय भूमिका असेल हे ठरवण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल.
2) गेल्या काही वर्षांत अनेक बडे नेते काँग्रेस (Congress) सोडून गेले आहेत. त्यामुळे काँग्रेस सोडून जाणाऱ्यांना रोखण्याचे आव्हानही मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमोर असणार आहे.
3) काही वर्षांपूर्वी काँग्रेस नेतृत्वाकडे नेतृत्व बदलाची मागणी करणारे बहुतांशी नेते पक्षातच आहेत. त्यामुळे आता मल्लिकार्जुन खर्गे त्यांचे समाधान करू शकतील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
4) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा, केंद्रातील सत्ताधारी सरकारचे दोन्ही प्रमुख नेते, अतिशय 'ताकदवान' नेते मानले जातात. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमोर आव्हान असेल की ते आता काँग्रेसला त्यांच्याशी लढण्यासाठी तयार करणे.
5) भाजप आणि मोदी-शहा जोडीला टक्कर देण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. ऐक्याचे प्रयत्न सामान्य वाटत असले तरी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विरोधी एकता सुनिश्चित करण्यासाठी आणि विरोधकांची आघाडी, तसेत देशात पक्षाचे महत्त्व कसे टिकवायचे हे देखील मोठे आव्हान खर्गे यांच्यासमोर असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.