Sanjay Singh  Sarkarnama
देश

Sanjay Singh Liquor Scam : 'मला वर पाठवण्याची तयारी होती'; संजय सिंहांच्या आरोपाने खळबळ !

Chetan Zadpe

Delhi News : मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आलेले आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना आज मंगळवारी (दि. १० ऑक्टोबर) न्यायालयात हजर करण्यात आले होते. पाच दिवसांची कोठडी संपल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना न्यायालयात हजर केले. या वेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सुनावणीदरम्यान संजय सिंह यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगितले. 'मला वर पाठवण्याची तयार होती, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सुनावणीदरम्यान संजय सिंह म्हणाले, 'रात्री 10.30 वाजता तुम्हाला बाहेर काढले जात असल्याचे सांगण्यात आले. न्यायाधीशांची परवानगी घेतली होती का? असे मी विचारले. मी फार आग्रह केल्यावर ते म्हणाले, मला लेखी द्या, मी ते लिहून दिले. दुसऱ्या दिवशीही असाच प्रकार घडला. याचा अर्थ त्यांना दुसरंच काही तरी घडवायचं होतं. आता न्यायाधीश साहेब, त्यांना याबद्दल जाब विचारा, ज्यांच्या सांगण्यावरून मला वर पाठवायची यांनी तयारी केली होती, असे सिंह म्हणाले.

आपच्या आमदारावरही कारवाई

आम आदमी पक्षाचे नेते व राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या अटकेनंतर आता आम आदमी पार्टीची अडचण आणखीनच वाढली आहे. आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला आहे. आज मंगळवारी सकाळी (दि.१० डिसेंबर) ईडीचे पथक आमदारांच्या निवासस्थानी पोहोचले. मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने हा छापा टाकला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT