Thirty Percent of corona Patients are from Tablighi Jammat Markaz
Thirty Percent of corona Patients are from Tablighi Jammat Markaz 
देश

देशातले ३० टक्के कोरोना रुग्ण 'तबलीगी'च्या 'मरकझ'मधील?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आज देशात कोरोनाच्या ज्या केसेस सापडत आहेत, त्यापैकी ३० टक्के केसेस या तबलीगी जमातच्या मरकझ कार्यक्रमातून आल्या असल्याचा धक्कादायक खुलासा आरोग्य मंत्रालयाने केला आहे. देशातील सतरा राज्यांमध्ये एक हजारांहून अधिक कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण मिळाले असून हे सर्व तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी होते, अशी माहिती देण्यात आली आहे. 

गेल्या महिन्यात दिल्लीतील निझामुद्दीन येथे तबलीगी जमातचा मरकझ हा कार्यक्रम झाला होता. तेथून बाहेर पडलेले लोक देशाच्या विविध भागांमध्ये गेले आहेत. त्या सर्वांना शोधण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्रातही गेल्या ४८ तासांमध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यातले बहुसंख्य हे तबलीगी जमातच्या कार्यक्रमातून आल्याचे आता स्पष्ट होत आहे. यापैकी काहींचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यामुळे राज्यातल्या यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT