Praniti Shinde Sarkarnama
देश

Praniti Shinde: "ही तर भाजपच्या अंताची सुरुवात"; सभागृहातील सरकारच्या पराभवावर खासदार प्रणिती शिंदेंची तिखट प्रतिक्रिया

Pranitee Shinde: विशेष अधिवेशनात लोकसभेत नारी शक्ती वंदन अधिनियम सुधारणा विधेयक मंजुर करुन घेण्यात सरकार अपयशी ठरलं आहे.

Amit Ujagare

Praniti Shinde on Nari Shakti Vandan Adhiniyam Bill : पुढची २०२९ची लोकसभा निवडणूक ८५० जागांसह लढवण्याच्या भाजपप्रणित एनडीए सरकारची योजना धुळीस मिळाली आहे. कारण यासाठी सरकारनं आणलेल्या मतदारसंघ फेररचना विधेयक लोकसभेत दोन तृतीयांश मतदानाअभावी नामंजूर झालं. हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ही तर भाजपच्या शेवटाची सुरुवात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

लोकसभेत नारी शक्ती वंदन अधिनियम घटनादुरुस्ती विधेयकावर मतदान केल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, यांनी २०२४ मध्ये महिला आरक्षण कायदा लागू न करता खूप मोठं पाप केलं आहे. सध्या ५४३ जागांवरच २०२४ मध्ये महिला आरक्षण लागू झालं असतं. आज मतदारसंघ फेररचना विधेयक नामंजूर झालं आहे. पहिल्यांदाच सरकारला पराभवाला समोरं जावं लागलं आहे. त्यांचे चेहरे सभागृहात बघण्यासारखे होते. त्यांना दोन तृतीयांश बहुमत मिळवता आलं नाही. आम्ही वारंवार ही मागणी करत होतो की, मतदारसंघ फेरररचना आणि महिला आरक्षण विधेयक एकमेकांना जोडू नका. पण त्यांनी हा अन्याय आणि पाप देशातील महिलांवर केलं आहे, त्यामुळं त्यांना आज हे भोगावं लागणार आहे.

भाजपच्या अंताची सुरुवात

दोन तृतीयांश बहुमत न मिळू शकल्यानं भाजप सरकारचा पराभव झाला आहे. देशाच्या अखंडतेला धोक्यात आणणारा हा कायदा होता. देशाला तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात हा निर्णय गेला आहे त्यामुळं त्यांचं विधेयक मंजूर होऊ शकलेलं नाही. त्यामुळं ही भाजपच्या अंताची सुरुवात आहे.

मतदान कसं झालं?

दरम्यान, सभागृहात उपस्थित एकूण ५२८ खासदारांपैकी ४८७ खासदारांनी इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे केलेल्या मतदानात या विधेयकाच्या बाजूनं २७८ मतं पडली तर विरोधात २११ मतं पडली. तसंच उर्वरित ४१ खासदारांनी चिठ्ठीद्वारे केलेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूनं २० मतं पडली तर विरोधात २१ मतं पडली. त्यानुसार, एकूण ५२८ मतांपैकी विधेयकाच्या बाजूनं २९८ मतं पडली तर विरोधात २३० मतं पडली. हे विधेयक पारीत होण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजेच ३५२ मतं आवश्यक होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT