Narendra Modi Keral Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता पुन्हा एकदा हल्ल्या करणार असल्याची धमकी, एका पत्रातून देण्यात आली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे. केरळ राज्याच्या दौऱ्यात नरेंद्र मोदींना टार्गेट करणार, असा इशारा या पत्रात नमूद करून, जीवे मारण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती, केरळ भाजपचे प्रांतअध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळ राज्यात पहिल्या वंदे भारत ट्रेनच्या उद्धाटनाला जाणार आहेत. (Warning of attack on PM Modi at Kerala visit letter recieved by BJP)
सुरेंद्रन म्हणाले, "पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचं पत्र मिळालं आहे. कोचीमधील एका व्यक्तिने मल्यालम भाषेत हे पत्र लिहलेले आहे. एका आठवडा आधी आमच्या भाजपच्या कार्यालयात हे पत्र पोहचलं होतं. आता हे पत्र राज्याच्या पोलीस महासंचालकांकडं देण्यात आलं आहे. "
एका हिंदी वृत्तवाहिनीच्या दाव्यानुसार, "पोलीसांनी एन. के. जॉनी नावाच्या एका संशयिताला या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. पत्रातील नमूद पत्त्यावरून या व्यक्तिला ताब्यात घेतले आहे. या पत्रामध्ये मोदींना मादी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासारखंच उडवू, अशी धमकी देण्यात आली आहे. जॉनी हा कोची शहरात वास्तव्यास असून, त्याने हे पत्र लिहिलं नसल्याचं म्हंटले आहे.
जॉनीचं म्हणणं काय ?
"केऱळ पोलिसांनी जॉनीच्या घरी जात, पत्राबद्दल चौकशी केली.पोलिसांनी या पत्रातील हस्ताक्षर आणि माझं हस्ताक्षर याची तुलना करून तपासणी केली. मात्र पोलिसांच्या लक्षात आले की, हे पत्र मी लिहलेलं नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.