Parliament, Narendra Modi Sarkarnama
देश

Modi Government: हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन विधेयकांचा मार्ग मोकळा; राष्ट्र्पतींनी दिला 'ग्रीन सिग्नल'

Sachin Waghmare

New Delhi: संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरले असून विरोधी पक्षातील खासदारांचे ऐतिहासिक निलंबन यावेळी करण्यात आले. त्यानंतर याचवेळी सरकारकडून तीन विधेयक मंजूर करण्यात आले होते. या मंजूर करण्यात आलेल्या विधयेकावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला. सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही तीन विधायके मंजूर केले आहेत.

या हिवाळी अधिवेशनात लोकसभा (loksabha) व राज्यसभेतील एकूण 146 खासदारांना निलंबित करण्यात आल्याने भाजपाला आव्हान देणाऱ्या विरोधकांचा आवाज कमकुवत झाला होता. याचवेळी सरकारकडून भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा ही विधेयक मंजूर करण्यात आले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांनी लोकसभेत भारतीय न्याय संहिता (द्वितीय सुधारणा) (एनबीएस-२०२३), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (द्वितीय सुधारणा) (बीएनएसएस-२०२३) व भारतीय साक्ष (द्वितीय सुधारणा) (बीएस-२०२३) अशी तीन विधेयके सादर केली आणि मंजूरही करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा ही तीन विधायके मंजूर केले आहेत. ही तीन विधायके मंजूर केली जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. हे तीन विधायके मंजूर झाल्याने सत्ताधारी पक्षात आनंदाचे वातावरण आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT