Sex Racket in Indore Sarkarnama
देश

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; भाजपच्या तीन पदाधिकऱ्यांना अटक

सरकारनामा ब्युरो

इंदौर : सलूनमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 18 जणांना अटक केली असून त्यामध्ये भाजपच्या (BJP) तीन कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेश काँग्रेस (Congress) कडून याबाबत दावा करण्यात आला असून त्यांचे फोटोही ट्विटरवरून उघड केले आहेत.

पोलिसांनी अटक केलेले तिघेही मध्य प्रदेशच्या वनमंत्र्यांचे जवळचे समर्थक असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे. इंदौरमधील (Indore) विजयनगर भागात सुरू असलेल्या सलूनवर पोलिसांनी गुरूवारी छापा टाकला होता. या छाप्यामध्ये थायलंड येथील सात महिला व तीन पुरूष ग्राहक आढळून आले होते. त्यावरून राज्यातील राजकारण (Politics) तापलं असून काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा (Narendra Saluja) यांनी या तीन पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचेही हे तिन्ही पदाधिकारी आहेत. तसेच वन मंत्री विजय शहा यांचे ते निकवर्तीय असल्याचा दावा सलुजा यांनी केला आहे. भाजपचे प्रवक्ते उमेश शर्मा यांनीही या तिघांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

शर्मा म्हणाले, पक्षाच्या खांडवा जिल्ह्याची समिती या प्रकरणाची माहिती घेत आहे. तिघांचा या प्रकरणात समावेश असल्याचे सिध्द झाल्यास निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. हे सलून फॅमिली स्पाच्या नावाखाली चालवलं जात होतं. एका ग्राहकानेच या भंडाफोड केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी केलेल्या छापेमारीमध्ये युवतींसह ग्राहकही पकडण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपच्या युवा मोर्चाचा उपाध्यक्ष, महामंत्री व कार्यकर्त्यालाही अटक करण्यात आली आहे. त्यावरून काँग्रेसने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावरही टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT