शाहजहांपूर : एकाच घरातील दोन व्यक्तीही निवडणुकीच्या मैदानात एकमेकांसमोर उभे राहिल्याचं पाहायला मिळत आहे. प्रचारादरम्यानही अगदी नात्यांचीच लढाई सुरु होणार आहे. उत्तरप्रदेश विधानसभा (Uttar Pradesh Assembly Election) निवडणुकीत भाजप (bjp) आणि समाजवादी पक्षाच्या (sp) उमेदवारांमध्ये नातेसंबधातच लढत होत असल्याचे चित्र आहे. शाहजहांपूर जिल्ह्यातील तिलहर विधानसभेत ही लढत होत आहे.
भाजपच्या उमेदवार सलोना कुशवाह यांच्याविरोधात त्यांच्या सख्य़ा भावानेच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच मतदार संघात सपाचे विद्यमान आमदार रोशन लाल वर्मा यांच्या विरोधात त्यांची सून निवडणुकीच्या मैदानात आहे. निकालानंतर कोण कुणावर भारी पडलंय हे १० मार्चला समजेल. राजकीय रिंगणात एकमेकांना ते टफ फाईट देतील हे मात्र निश्चित आहे.
शाहजहांपूर जिल्ह्यात दुसऱ्या टप्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. तिलहर विधानसभा मतदारसंघात सलोना यांच्या विरोधात त्यांचा भाऊ रावेंद्र कुशवाहा यांनी अर्ज दाखल केला आहे. यावर रावेंद्र कुशवाहा म्हणाले, ''ज्या बहीणीला भावाविषयी काही वाटत नाही, ती जनतेची कशी वागत असेल हे सर्वांना माहित आहे,''
तिलहर विधानसभा मतदार संघात गेल्या वेळी भाजपच्या तिकीटावर आमदार झालेले रोशनलाल वर्मा आता निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षात दाखल झाले आहेत. सपाने त्यांना उमेदवारी दिली आहे. येथे वर्मा यांच्याविरोधात त्यांची सून सरिता यादव निवडणुक लढवत आहेत.
रावेंद्र कुशवाहा म्हणाले, ''माझी बहीण सलोना कुशवाहा हीने आमच्या परिवाराचं शोषण केलं आहे. तिनं गुंडामार्फेत आम्हाला धमकी दिली आहे. तिच्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे मी तिच्याविरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे,''
सलोना कुशवाहा म्हणाल्या, ''माझे लग्न अनेक वर्षापासून झाले असून माझे त्यांच्या परिवाराशी काहीही संबध नाही. मी कुणालाही धमकी दिलेली नाही. रावेंद्र कुशवाहा आणि त्याच्या परिवारांशी माझा काहीही संबध नाही,''
सरिता यादव म्हणाल्या, ''मला तिलहर मतदार संघातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विद्यमान सरकारने मुस्लिम आणि यादव समाजाला खूप त्रास दिला आहे. त्यांना न्याय देण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे,''
तर दुसरीकडे रोशनलाल वर्मा यांनी सांगितले की मला बदनाम करण्यासाठी सरिता यादव निवडणूक लढवत आहे, तिच्या आमच्या परिवाराशी कोणताही संबध नाही,'' रोशनलाल वर्मा यांचे सुपुत्र विनोद वर्मा यांचे निधन झाले आहे. सरिता यादव यांनी २०१२ मध्ये रोशनलाल वर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.