tirupati-yes-bank
tirupati-yes-bank 
देश

यस्स! बालाजी पावला : तेराशे कोटी रूपये धोक्यात येण्यापासून वाचले

सरकारनामा ब्यूरो

तिरूपती ः देवाची मर्जी म्हणा अथवा नशीब. पण तिरूपती देववस्थान ट्रस्टचे म्हणजेच बालाजी देवस्थनाचे  तब्बल तेराशे कोटी रूपये धोक्यात येण्यापासून वाचले आहेत. 

बालाजी देवस्थानचे तब्बल तेराशे कोटी रुपयांच्या ठेवी आणि सोने हे यस बॅंकेमध्ये होते. यस बॅंकेवर चार दिवसांपूर्वी निर्बंध लादले. त्यानुसार खातेदारांना महिन्याला 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यावर मर्यादा आणली होती. यस बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून रिझर्व्ह बॅंकेने स्वंतत्र संचालक मंडळ नेमले आहे. तसेच या बॅंकेची 49 टक्के हिस्सेदारी घेण्यासाठी स्टेट बॅंकेला सांगण्यात आले आहे. 

तिरूपती ट्रस्ट हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान आहे. देवस्थानच्या तब्बल 12 हजार कोटी रुपयांच्या ठेवी या विविध बॅंकांत आहेत. त्यात सर्वाधिक ठेवी या यस बॅंकेमध्ये होत्या. या बॅंकेची स्थिती चांगली नसल्याचे लक्षात आल्यानंतर देवस्थानने सर्वच्या सर्व ठेवी आॅक्टोबरमध्येच बॅंकेतून काढून घेतल्याचे देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी सांगितले. देव बालाजीनेच आम्हाला ही बुद्धी दिली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

आंध्र प्रदेशमधील तेलगू देसमचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या देवस्थानला 5000 कोटी रूपये खासगी बॅंकांत ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रेड्डी यांनीकेला. खासगी बॅंका या एक-दोन टक्के जास्त व्याजदर म्हणतात तेथे ठेवी ठेवण्याकडे कल होता. भाविकांचा पैसा असा धोक्याच्या ठिकाणी न ठेवण्याचा निर्णय देवस्थानने घेतल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT