Abhishek Banerjee, Mamata Banerjee
Abhishek Banerjee, Mamata Banerjee Sarkarnama
देश

ममतांचा थेट भाच्यालाच दणका; मोठ्या पदावरून हटवत पंख छाटले

सरकारनामा ब्युरो

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील (TMC) मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. पक्षाच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्यात वाद सुरू झाल्याचे समोर येत आहे. ममतांनी शनिवारी तडकाफडकी बैठक बोलवत राष्ट्रीय अध्यक्ष हे पद वगळता इतर सर्व पदे बरखास्त केली आहेत. (West Bengal Politics)

ममतांच्या या निर्णयाचा दणका अभिषेक यांनाही बसला आहे. अभिषेक यांच्याकडे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस हे पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पद होते. ममता या पक्षाच्या अध्यक्ष आहेत. हे पद वगळता त्यांनी त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीसह सर्व पदे बरखास्त केली. त्यामुळे अभिषेक यांच्याकडील सरचिटणीस पदही काढून घेण्यात आलं आहे. बैठकीमध्ये नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. (Trinamool Congress Update)

नव्या कार्यकारिणीमध्ये अभिषेक यांना स्थान देण्यात आले आहे. पण सरचिटणीस पदाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अभिषेक यांच्याकडे हे पद राहणार की नाही, याबाबत आता राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहे. कार्यकारिणीत डेरेक ओब्रायन आणि सौगत राय यांना स्थान देण्यात आलेले नाही. यशवंत सिन्ही, अमित मित्रा, पार्थ चटर्जी, सुब्रत बक्शी, सुदीप बंदोपाध्यय, अनुब्रत मंडल, अरूप विश्वास आणि फिरहाद हकीम या नेत्यांचा कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

सरचिटणीस व इतर पदांवरील नावांची घोषणा नंतर केली जाणार आहे. या राजकीय घडामोडींमुळे तृणमूलमधील वाद चव्हाट्यावर आले आहे. एक व्यक्ती, एक पद या धोरणाचा आग्रह अभिषेक बॅनर्जी यांनी धरला आहे. पक्षात ममतांनंतर अभिषेक हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या या धोरणाला पक्षाच्या जुन्या नेत्यांचा विरोध आहे. काही जणांच्या मते, ममता आणि त्यांचे अतिशय महत्वकांक्षी भाचे अभिषेक यांच्यातील संघर्ष वाढू लागल्याची ही चिन्हे आहेत. पक्षांतर्गत हा वाद वाढू लागताच ममतांनी तातडीने पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक शनिवारी बोलावली होती.

ममतांनी नुकताच उत्तर प्रदेशचा दौरा केला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या प्रचारासाठी हा दौरा होता. त्यावेळी ममतांना गोव्यातील प्रचाराबाबत प्रश्न विचारण्यात आला. गोव्यात कुणीतरी प्रचार करीत असताना मी जाणार नाही. मी दुसरीकडे जाईन. यातून सगळ्यांचे हित साधले जाईल, असे टिप्पणी ममतांनी केली होती. त्यांनी अभिषेक यांचा उल्लेख कुणीतरी असा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर आता काही दिवसांतच तृणमूलमधील वाद उफाळून आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT