Mukul Roy News : पश्चिम बंगालच्या राजकारणातील चाणक्य, माजी रेल्वेमंत्री मुकुल राॅय यांचे आज पहाटे दीडच्या सुमारास निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. कधी काळी मुख्यमंत्री ममना बॅनर्जी नंतर पक्षातील क्रमांक दोनचे ते नेते होते.
काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे राॅय हे ममता बॅनर्जी यांचे विश्वास मानले जात. त्यांनी तृणमूल पक्षाचे सरचिटणीस पद देखील भूषवले आहे. युपीए सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. तर, 2012 मध्ये ते रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला होता.
राॅय यांचे नाव शारदा चिट फंड घोटाळ्यात आले होते. त्यानंतर ते वादात सापडले. त्यांचे आणि ममता बॅनर्जी यांचे संबंध देखील तणावाचे झाले होते. 2017 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपला बंगालमध्ये यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे 17 खासदार विजयी झाले होते. अनेक दिग्गज नेत्यांना त्यांनी भाजपमध्ये आणले होते.
भाजपमध्ये राॅय हे रमले नाहीत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून विजय मिळवत आमदार झाले होते. मात्र, ते पक्षाचा राजीनामा देत जून 2021 मध्ये पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये आले होते. दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबर 2025 मध्ये न्यायालयाने त्यांनी पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवत त्यांनी आमदारकी रद्द केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.