Amit Shah and Rajib Banerjee

 

Sarkarnama

देश

शहांकडून बड्या नेत्याच्या प्रवेशासाठी आधी चार्टर विमान अन् पक्ष सोडताच झेड सुरक्षा गायब

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या (Amit Shah) उपस्थितीत भाजप (BJP) प्रवेशासाठी चार्टर विमानाने बड्या नेत्याला दिल्लीला नेण्यात आले होते.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) आधीच्या सरकारमध्ये वनमंत्री असलेले राजीव बॅनर्जी (Rajib Banerjee) यांना भाजप प्रवेशासाठी चार्टर विमानाने दिल्लीला नेण्यात आले होते. तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या (Amit Shah) उपस्थितीत त्यांचा भाजप (BJP) प्रवेश झाला होता. आता याच राजीव बॅनर्जींनी पक्ष सोडताच त्यांना मोठा धक्का देण्यात आला आहे. त्यांची झे़ड सुरक्षा तडकाफडकी काढून घेण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमधील पराभवानंतर राज्यातील भाजपची गळती सुरू आहे. विधानसभा निवडणुकीआधी तृणमूल काँग्रेस (TMC) सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या फळीच्या नेत्यांमध्ये राजीव बॅनर्जी यांचा समावेश होता. त्यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर महिन्याच्या आतच ते भाजप सोडून पुन्हा तृणमूलमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी भाजपमध्ये गेल्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला होता.

राजीव बॅनर्जी यांनी 1 नोव्हेंबरला भाजपला रामराम केला होता. त्यांना आधी केंद्र सरकारने झेड सुरक्षा दिली होती. त्यांनी भाजप सोडल्यानंतर महिनाभराने ही सुरक्षा काढून घेण्यात आली. ते तृणमूलकडून हावड्यातील डोमजूर मतदारसंघातून 2011 आणि 2016 मध्ये निवडून आले होते. भाजपकडून मागील विधानसभा निवडणुकीत मात्र, ते याच जागेवर पराभूत झाले होते.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीआधी भाजपने तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना फोडले होते. भाजपमध्ये प्रवेश करु इच्छिणाऱ्या तृणमूलच्या बंडखोर नेत्यांसाठी अमित शहांनी दिल्लीहून कोलकत्याला चार्टर विमान पाठवण्यात आले. या बंडखोर नेत्यांना चार्टर विमानाने दिल्लीत नेऊन अमित शहांसमोर उभे करण्यात आले. अखेर त्यांचा नाट्यमय पद्धतीने पक्षप्रवेश झाला होता. यात तृणमूलचे नेते राजीव बॅनर्जी यांचा समावेश होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT