BJP

 

Sarkarnama

देश

ममतांची जादू पुन्हा चालली; महापालिका निवडणुकीतही भाजपाचा सुफडा साफ होणार

कोलकाता महापालिकेचे निवडणूक निकाल हाती येत असून तृणमूलने मोठी आघाडी घेतली आहे.

सरकारनामा ब्युरो

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) ऐतिहासिक विजय मिळवत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सत्ता मिळवली. या निवडणुकीत भाजपने (BJP) प्रतिष्ठा पणाला लावली होती. पण मतांनी एकहाती विजय मिळत विरोधकांना धूळ चारली. त्यानंतर आठ महिन्यांनी होत असलेल्या कोलकाता महापालिका निवडणुकीतही (Kolkata Municipal Corporation) ममतांनी विरोधकांना धक्का दिल्याचे चित्र आहे.

कोलकाता महापालिकेच्या 144 जागांसाठी 19 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने अनेक ठिकाणी आघाडी घेतल्याचा कल होता. हा कल अजूनही कायम असून आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार तृणमूलने 116 जागांवर आघाडी घेतल्याचे दिसते. भाजप, काँग्रेस (Congress) व डावे पक्ष तृणमूलच्या खूप मागे पडल्याचे चित्र आहे.

मतदानाआधी भाजप व तृणमूलमध्ये जोरदार खडागंजी उडाली होती. ही निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती भाजपने केली होती. हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचलं होतं. पण कडेकोट बंदोबस्तात झालेल्या या निवडणुकीत तृणमूलच बाजी मारणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत टीएमसीला 124 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपच्या पदरात केवळ पाच जागा पडल्या होत्या. तसेच डाव्यांनाही पाचच जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या.

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा भाजपकडून उचलून धरण्यात आला होता. पण या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा तृणमूलच्याच बाजूने कल दिल्याचे दिसते. बहुतेक वॉर्डमध्ये तृणमूलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून मागील निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त जागा मिळण्याची अपेक्षा पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. तर भाजपला विधानसभेपाठोपाठ महापालिका निवडणुकीतही यश मिळताना दिसत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT