Saayoni Ghosh news  Sarkarnama
देश

TMC MP: सायोनी घोष, यूसुफ पठाण यांच्यासह २० बंडखोरांच्या गटाला झटका! भाजपनं विलीनीकरणाला मंजुरी मिळण्याआधीच झिडकारलं...

TMC MP: भाजपच्या एका नेत्यानं सांगितलं की, जर भाजप NCPI सोबत निवडणूक लढवली तर ते दुर्देवी असेल कारण तृणमूलच्या भ्रष्ट लोकांविरोधात आम्ही वर्षानुवर्षे लढाई लढलो आहोत.

Amit Ujagare

TMC MP: सयोनी घोष, काकोली घोष दस्तीदार आणि सुदीप बंदोपाध्याय यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे (TMC) बंडखोर २० खासदारांच्या गटाला भाजपनं जोरदार झटका दिला आहे. या गटानं NCPI नावाच्या पक्षात प्रवेश केला आहे. पण त्यांच्या गटाच्या विलिनिकरणाला मान्यता मिळण्याआधीच भाजपनं त्यांना सोबत घेण्यास नकार दिला आहे. पण यामुळं लोकसभेतील दोन तृतीयांश संख्याबळापर्यंत पोहोचण्यात एनडीएचा मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेमका विषय काय?

तृणमूल काँग्रेसच्या २० फुटीर खासदारांनी NCPI या पक्षात प्रवेश केला असल्यानं आता हे खासदार या पक्षाचे खासदार झाले आहेत. आता भाजपनं पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या महापालिका निवडणुकीत या पक्षासोबत आघाडी करण्यास नकार दिला आहे. मूळ तृणमूलचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी म्हटलं होतं की, त्यांचा पक्ष NCPI कोलकाता महापालिकेची निवडणूक भाजपसोबत मिळून लढवणार आहे. पण त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजपनं याला पूर्णपणे नकार दिला आहे.

सुदीप बंडोपाध्याय यांनी बुधवारी म्हटलं की, त्यांचा पक्ष NDA चा भाग असल्याकारणानं येणाऱ्या कोलकाता महापालिका (KMC) निवडणूक लढवेल. या खासदारानं पत्रकारांना सांगितलं की, आम्ही महापालिका निवडणूक एनडीए म्हणून लढवणार आहोत. यासाठी आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली आहे, त्यांनी याला हिरवा कंदील दाखवला आहे. पण बंडोपाध्याय यांच्या विधानाच्या काही तासांतच KMCचे निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय राज्य मंत्री सुकांत मुजूमदार यांनी स्पष्ट केलं आहे की, या निवडणुकीत भाजप हा पक्ष एकटाच मैदानात उतरणार आहे.

एकत्र निवडणूक लढवण्याचा कोणताही विचार नाही

मुजूमदार यांनी न्यू टाऊनस्थित आपल्या घरी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितलं की, आमच्या प्रदेशाध्यक्षांनी आधीच सांगितलं आहे की, राज्यात भाजपचा कोणीही सहकारी नाही. आम्ही बंगालमध्ये विधानसभा निवडणूक कोणाच्याही सहकार्याशिवाय लढलो होतो. त्यामुळं आम्ही विक्रमी जागा जिंकल्या, त्यामुळं कोणत्याही सहकाऱ्यासोबत लढवली हन्व्हती आम्ही एकट्यानं लढलो आणि कोणा सहकार्याबत एकट्यानं लढले नाही आणि माझ्यापर्यंत असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही

लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमताचा निर्माण होणार पेच?

जर भाजपनं NCPIसोबत कोलकाता महापालिकेची निवडणूक एकत्र लढवली नाही तर त्याचे दूरगामी परिणाम पाहायला मिळू शकतात. कारण लोकसभेत एनडीएकडं दोन तृतीयांश बहुमत नाहीए ते कुठल्याही किंमतीत मिळवण्यासाठी भाजपची खटपट सुरु आहे. कारण डिलिमिटेशनसाठी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी या दोन-तृतीयांश बहुमताची गरज आहे. यासाठी भाजपला तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर २० खासदारांची गरज आहे. त्यामुळं जर हा गट भाजपवर नाराज झाला तर भाजपचा मोठा प्रोब्लेम होणार आहे. पण यासाठी तोडगा म्हणून भाजप या बंडखोर खासदारांच्या गटाला मंत्रीपद देऊन त्याची भरपाई करणार असल्याची देखील चर्चा आहे. या वर्षी डिसेंबर २०२६ मध्ये कोलकाता महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी वॉर्ड रचनांचं काम सुरु असून निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी देखील सुरु आहे. या ठिकाणी सध्या १४४ वॉर्ड आहेत त्यात वाढ करुन ते २०९ पर्यंत वाढवण्यात येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT