Karnataka Elections 2023:
Karnataka Elections 2023: Sarkarnama
देश

Karnataka Elections 2023: कर्नाटकात प्रचारतोफा आज थंडावणार; या मुद्द्यांवरुन उडाला प्रचाराचा धुराळा

सरकारनामा ब्युरो

Karnataka Elections 2023 : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणुका (Karnatak Election 2023) होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. संपुर्ण देशाचे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे. भाजप आणि काँग्रेसने या दोन्ही पक्षांनी आपली ताकद पणाला लागली आहे.

कर्नाटक निवडणुकांसाठी गांधी कुटुंबियांनी आपली ताकद पणाला लावल्याचे दिसत आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी रोड शो करणार आहेत. आतापर्यंतच्या निवडणूक प्रचारात राहुल-प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत. स्थानिक मुद्दे उपस्थित करून काँग्रेस (Congress) भाजपवर हल्लाबोल करत आहे. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात या स्थानिक समस्यांचा लगाम स्थानिक नेत्यांच्या हातात होता. जो आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंपासून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या हातात आला आहे.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कर्नाटकातील हुबळी येथे जाहीर सभेला संबोधित करताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला. कर्नाटकातील लोक कष्ट करून आपले जीवन जगत असून त्यांना कोणाच्याही आशीर्वादाची गरज नाही.राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे भाजपला पराभवाची भीती वाटू लागली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही काल कर्नाटकात प्रचार केला. या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी नुकताच प्रदर्शित झालेला द केरळ स्टोरी चित्रपटाचा आधार घेतल्याचे पाहायला मिळाले. देशाचे इतके सुंदर राज्य, पण या चित्रपटाच्या माध्यमातून केरळमध्ये सुरू असलेला दहशतवादी कट उघड झाल्याचं पंतप्रधान मोदीं यांनी म्हटलं आहे.

"देशाला उद्ध्वस्त करणाऱ्या या दहशतवादी प्रवृत्तीच्या पाठीशी काँग्रेस उभी असल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर काँग्रेस अशा दहशतवादी प्रवृत्ती असलेल्या लोकांशी मागच्या दरवाजाने व्यवहारही करत असल्याचा आरोपही नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT