Bhupesh Baghel Sarkarnama
देश

दहावी, बारावीत अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार हेलिकॉप्टरची मोफत राईड

कोरोनामुळे गेली दोन वर्ष सर्वच विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात आले होते.

सरकारनामा ब्यूरो

रायपूर : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी एक आंनदाची बातमी दिली आहे. जे विद्यार्थी दहावी, बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात अव्वल येतील त्या सर्व विद्यार्थ्यांना छत्तीसगड सरकारकडून (Government of Chhattisgarh) हेलिकॉप्टरची मोफत राईड (Free helicopter ride) मिळणार आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री बघेल यांनी म्हटले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ ट्विट करून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री बघेल हे आज बलरामपूर-रामानुजगंज जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. येथेच पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे. तसेच या घोषणेबाबतचे ट्विट सुद्धा त्यांनी केले आहे. मिलेगी हर सपने को अब उड़ान #HelicopterRide, असे कॅप्शन देत त्यांनी ट्विट करून हा निर्णय जाहिर केला आहे.

छत्तीसगडमधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लवकरच लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बघेल यांनी ही घोषणा केल्याची माहिती मिळत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्ष सर्वच विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात आले होते. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादी जाहीर करण्यात आल्या नव्हत्या मात्र, यंदा ही यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी बघेल यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे.

मुख्यमंत्री बघेल यांनी घेतलेल्या या निर्णयाचा विद्यार्थ्यांना किती फायदा होईल हे माहित नाही मात्र, अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरची मोफत राईड मात्र नक्की मिळणार आहे. बघेल यांच्या या निर्णयाची चर्चा मात्र, देशभर होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT