MP Vandana Chavan, Rajani Patil Sarkarnama
देश

Parliament Winter Session : वंदना चव्हाण, रजनी पाटील यांच्यासह राज्यसभेतील 34 खासदार निलंबित

Rajya Sabha : लोकसभेत आतापर्यंत 46 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

Rajanand More

Lok Sabha Security Breach : लोकसभेपाठोपाठ विरोधकांना राज्यसभेतही दणका बसला आहे. लोकसभा घुसखोरी प्रकरणावरून राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षातील 34 खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण आणि काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांचाही समावेश आहे.

लोकसभेत 13 डिसेंबर रोजी घुसखोरीची घटना घडल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. या मुद्यावरून लोकसभेत आतापर्यंत 46 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. तर राज्यसभेतील एका खासदारांचा समावेश होता. मात्र, सोमवारी राज्यसभेतील आणखी 34 खासदारांना निलंबित करण्यात आल्याने हा आकडा 35 वर पोहचला आहे.

राज्यसभेतील निलंबित खासदारांमध्ये वंदना चव्हाण, रजनी पाटील यांच्यासह जयराम रमेश, रणदीप सुरजेवाला, केसी वेणुगोपाल या काँग्रेसच्या खासदारांसह इतर पक्षातील खासदारांचाही समावेश आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी खासदारांना निलंबित करताना नाराजी व्यक्त केली. सोमवारी सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासून दोनदा तहकूब करण्यात आले. खासदारांना सातत्याने सुचना देऊनही गोंधळ घातल्याने निलंबित करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लोकसभेत 13 डिसेंबरला दोन तरुणांनी घुसखोरी केली होती. तर संसदेबाहेर दोघांनी घोषणाबाजी करत स्मोक कॅंडल जाळण्यात आल्या होत्या. याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक कऱण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू असतानाच ही घुसखोरी झाल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दोन्ही सभागृहात जोरदार खडाजंगी सुरू आहे. 

विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी घुसखोरीच्या मुद्द्यावर निवेदन देण्याची मागणी केली आहे. तसेच पंतप्रधानांनी एका वृत्तपत्राला दिलेली मुलाखत आणि अमित शाह यांनी वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीवरून विरोधकांनी निशाणा साधला आहे. मोदी आणि शाह यांचे संसदेप्रती शुन्य उत्तरदायित्व असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केली आहे.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT