कोलकता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समशेरगंज विधानसभा मतदारसंघात बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली. ''राज्यातील भाजप नेते आणि त्यातही आमदार असणारे हे तृणमूल कॉंग्रेसच्या (Trinamool Congress) कार्यालयाबाहेर रांग लावत आहेत. परंतु दरवाजा बंद आहे. जर दरवाजा उघडला तर नक्कीच भाजप कोलमडून पडेल,'' असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.
गेल्या काही दिवसात भाजप नेत्यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने अभिषेक बॅनर्जी यांनी आणखी काही नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे मत मांडले.पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते हे तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी कार्यालयाबाहेर रांग लावत असल्याचा दावा सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे. दरवाजा उघडला तर राज्यातील भाजप पक्ष ढासळेल, असा दावाही त्यांनी केला.
बॅनर्जी म्हणाले, की राज्यातील भाजप नेते आणि त्यातही आमदार असणारे हे तृणमूल कॉंग्रेसच्या (Trinamool Congress) कार्यालयाबाहेर रांग लावत आहेत. परंतु दरवाजा बंद आहे. जर दरवाजा उघडला तर नक्कीच भाजप कोलमडून पडेल. ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत राज्याबाहेरच्या लोकांना पिटाळून लावले होते. आगामी निवडणुकीतही असेच घडणार आहे, असे बॅनर्जी म्हणाले.
राज्यात समशेरगंजसह तीन विधानसभा क्षेत्राची ३० सप्टेंबरला पोटनिवडणूक होत आहे. समशेरगंज मतदारसंघातून अमिरुल इस्लाम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कॉंग्रेसचे उमेदवार रिझुल हक यांचे निधन झाल्याने निवडणूक स्थगित केली होती. आता पोटनिवडणूक होत आहे. त्रिपुरातील भाजप सरकारने निवडणूक प्रचारसभा रोखण्यासाठी जमावबंदीचा कायदा लागू केला आहे. यावर बोलताना बॅनर्जी म्हणाले, ''त्रिपुरात किती दिवस निर्बंध लागू ठेवाल. येत्या विधानसभेला तृणमूलचा नक्कीच विजय होईल. येत्या तीन महिन्यांत तृणमूलचे यश लोकांना पाहावयास मिळेल.'' त्रिपुरात पुढील वर्षाच्या प्रारंभी विधानसभा निवडणूक होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.