Tripura Election :
Tripura Election : Sarkarnama
देश

Tripura Election : 1 वाजेपर्यंत 51% मतदान : काही ठिकाणी हिंसक घटना!

सरकारनामा ब्यूरो

Tripura Election : भारताच्या ईशान्येतील त्रिपुरा राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान आज (दि.16 फेब्रु) पार पडत आहे. त्रिपुरा विधानसभेच्या 60 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. त्रिपुरातील 28.13 लाख मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. 2 मार्चला निकाल जाहीर होणार आहे.

यापूर्वी त्रिपुरात भाजपचे सरकार पूर्ण बहुमतात होते. मुख्यमंत्री माणिक सहा हे राज्याची धुरा वाहत होते. आज त्रिपुरासाठी मतदान पार पडल्यानंतर तिथे पुन्हा भाजप सत्ता राखणार की, बदल होणार याबाबत राजकीय वर्तुळाला उत्सुकता निर्माण झाली आहे. आज दुपारी 1 वाजेपर्यंत त्रिपुरात एकूण 51 टक्के मतदान पूर्णा झाले.

दरम्यान, मतदानाच्या दिवशी काही हिंसात्मक घटना घडून आले. दक्षिण त्रिपुरातील 36 शांतीर बाजार येथे, कालाचेरा मतदान बूथच्या बाहेर एका सीपीआय समर्थकाला मारहाण करण्यात आली. पोलिसांकडून जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्रिपुरातील हरिपूर या ठिकाणीतील ऋषीमुख येथे हल्ला करण्यात आला. मतदारांना मतदान पार पाडण्यापासून रोखण्यात प्रयत्न करण्यात आला. याचे व्हिडीओज समाजमाध्यमावर व्हायरल झाले. अशा काही तुरळक घटनांचा अपवाद वगळता इतर मतदान सुरळीत पार पडत आहे.

दरम्यान, राज्यात जुनी पेन्शन योजना हा मुद्दा बनत चालला आहे. सीपीएमने आपले सरकार स्थापन झाले तर, पहिल्याच कॅबिनेट बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे उघडपणे असे कोणतेही आश्वासन न देणाऱ्या भाजपचाही डोकेदुखी वाढली आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी त्रिपुरामध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला आहे. आमच्या जागा आणि मतांची टक्केवारी दोन्ही वाढणार असल्याचा दावा त्यांनी केला होता.

2018 पक्षीय बलाबल :

  • एकूण जागा- 60

  • भाजप+आयपीएपीटी-44

  • माकप- 16, काँग्रेस- 0

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT