Donald Trump  Sarkarnama
देश

Donald Trump viral post : 'ट्रम्प यांचा नवा धमाका!' अमेरिकेसोबतच आता 'या' देशाचेही राष्ट्राध्यक्ष? 'सोशल मीडियावरील पोस्ट'ने जगात खळबळ!

Trump viral screenshot sparks global debate : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरील व्हायरल स्क्रीनशॉटमुळे जगभरात खळबळ. अमेरिकेसोबत आणखी एका देशाचे राष्ट्राध्यक्ष?

Rashmi Mane

Trump latest international political controversy : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी थेट दक्षिण अमेरिकेतील वेनेजुएला या देशाबाबत असा दावा केला आहे की, सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये स्वतःला थेट “वेनेजुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष” असे संबोधले आहे. हा दावा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून, ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि वेनेजुएला यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढलेला दिसून येतो. या महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेने वेनेजुएलाविरोधात मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली होती. या कारवाईदरम्यान वेनेजुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मादुरो यांना त्यांच्या पत्नी सीलिया फ्लोरेस यांच्यासह न्यूयॉर्क येथे नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर नार्को-टेररिझमशी संबंधित कट रचल्याचे गंभीर आरोप दाखल करण्यात आले.

यानंतर वेनेजुएलाच्या सत्तेची सूत्रे उपराष्ट्राध्यक्ष आणि तेल मंत्री डेल्सी रोड्रिग्ज यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांनी औपचारिकरित्या देशाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर ट्रम्प यांनी आणखी एक मोठे विधान करत वेनेजुएलातील अंतरिम प्रशासन अमेरिकााला ३० ते ५० दशलक्ष बॅरल उच्च दर्जाचे आणि अधिकृत तेल देईल, असे सांगितले. हे तेल बाजारभावानुसार विकले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ट्रम्प प्रशासन वेनेजुएलावर आणखी दबाव टाकत असल्याची माहितीही समोर आली आहे. चीन, रशिया, इराण आणि क्यूबा यांसारख्या देशांशी वेनेजुएलाने आर्थिक संबंध तोडावेत, अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. तसे केल्यासच वेनेजुएलाला अधिक प्रमाणात तेल उत्पादनाची परवानगी दिली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. एकूणच ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे आणि वेनेजुएलासंदर्भातील आक्रमक भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे. ट्रम्प यांचा हा दावा केवळ राजकीय वक्तव्य आहे की यामागे काही ठोस रणनीती आहे, याकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT