Donald Trump  Sarkarnama
देश

Trump Tarrif Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी 14 देशांवर लावला नवा टेरिफ; भारताला किती टक्के कर?

Donald Trump imposes new tariffs on 14 countries:बांगलादेश, बोस्निया आणि हर्जेगोविना, कंबोडिया, इंडोनेशिया, जपान, कझाकस्तान, लाओस, मलेशिया, म्यानमार, सर्बिया, ट्युनिशिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया आणि थायलंड या देशांना नवीन टेरिफ लावण्याची अधिसूचना डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

सरकारानामा ब्युरो

Trump Tarrif Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 14 देशांवर नवे टेरिफ लावले आहे. नव्या टेरिफमध्ये भारतावर किती टक्के असेल, याबाबत अद्याप चर्चा सुरु आहे. लवकरच याबाबतची घोषणा करण्यात येईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर हा निर्णय जाहीर केला.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सन्मानार्थ सोमवारी रात्री व्हाईट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या डिनरमध्ये ट्रम्प प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अमेरिकेने ब्रिटन आणि चीनसोबत व्यापारी करार केला आहे, ज्या देशांशी अमेरिकेचा व्यापार करार होऊ शकत नाही, त्या देशांना पत्र पाठवले आहे, असे ते म्हणाले.

बांगलादेश, बोस्निया आणि हर्जेगोविना, कंबोडिया, इंडोनेशिया, जपान, कझाकस्तान, लाओस, मलेशिया, म्यानमार, सर्बिया, ट्युनिशिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया आणि थायलंड या देशांना नवीन टेरिफ लावण्याची अधिसूचना डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. या देशांना पत्र पाठवले आहे. टेरिफबाबत काही देशांच्या बाबतीत त्यांच्याकडे योग्य कारण असेल तर यात थोडा बदल होऊ शकतो, त्यावर आम्ही अन्याय करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

म्यानमार आणि लाओसला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यावर ४० टक्के शुल्क लावण्यात आले आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील संभाव्य व्यापार कराराबाबत ट्रम्प यांनी हे वक्तव्य वॉशिंग्टनमध्ये आठवडाभर चाललेल्या चर्चेनंतर केले आहे.

९ जुलैपूर्वी दोन्ही देश ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतात, असे यापूर्वीच्या अहवालात म्हटले होते. भारत देशहितासाठी अमेरिकेसोबत व्यापार करार करण्यास तयार आहे. मात्र, कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली हे केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ लागू करण्याबाबत 90 दिवसाची सवलत दिली आहे. ती आज पूर्ण झाली आहे. उद्यापासून भारतासह अन् देशांना नवीन टेरिफ लागू होईल, त्यामुळे आज भारत आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या व्यापार-उद्योगावर चर्चा सुरु आहे. त्यानंतर भारतावर किती टेरिफ लावायचा हे निश्चित होईल. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडून बहुप्रतिक्षित करवाढ पत्र मिळण्याची अपेक्षा आज भारताला आहे. नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन द्विपक्षीय व्यापार करारावर सविस्तर वाटाघाटी सुरु आहे. दोन्ही देशांमधील करार ९ जुलैला फायनल केला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT