SEBI New Chairman Tuhin Kanta Pandey: मोदी सरकारच्या अर्थ मंत्रालयाचे सचिव तुहिन कांत पांडे यांची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया चे म्हणजे सेबीच्या (SEBI) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने गुरुवारी रात्री ही नियुक्ती जाहीर केली आहे. मंत्रिमंडळाच्या निवड समितीचे पांडे यांनी सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तीन वर्षांसाठी ते या पदावर राहतील. माधवी पुरी बुच यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेअर बाजारावर देखरेख ठेवण्यासाठी मोठी जबाबदारी सेबीच्या प्रमुखावर असते.
पांडेय हे 1987 च्या बॅचचे ओडिशा केडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. सप्टेंबरमध्ये 2024 त्यांनी अर्थमंत्रालयाच्या सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
पांडे हे उद्यापासून (शनिवार) पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत, याबाबतची माहिती केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. 1987 बैचचे सनदी अधिकारी असलेले पांडे हे अर्थमंत्रालय सांभाळणारे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत.
अर्थ मंत्रालयाचा महत्वाचा विभाग असलेल्या डीआईपीएएमचे ते अनेक वर्ष सचिव होते. सार्वजनिक क्षेत्रातील आर्थिक कंपन्यांबाबत अनेक महत्वाचे निर्णय या विभागाकडून घेण्यात येतात.
संजय मल्होत्रा यांची भारतीय रिजर्व बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यानंतर पांडे यांची 9 जानेवारी रोजी या विभागात नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी 2025-26 च्या केंद्रीय बजेट तयार करण्याची महत्वाची भूमिका घेतली होती. मध्यमवर्गाला त्यांनी १ लाख कोटी रुपयांचे कर सवलत दिली आहे. नव्या आयकर विधेयकाचा मसुदा तयार करण्यात त्यांचा समावेश होता.
संसदेच्या लोक लेखा समितिसमोर मंत्रालयाचे त्यांची प्रतिनिधित्व केले होते. भारतीय अर्थव्यवस्थेला आकार देण्यात पांडे यांचे योगदान मोठे आहे. सेबीच्या अध्यक्षपदाची महत्वाच्या मोठी जबाबदारी त्यांच्यावर मोदी सरकारने सोपवली आहे. एअर इंडियाची विक्री आणि एलआयसीच्या पब्लिक लिस्टिंगचे काम त्यांनी केले आहे.
पांडे यांनी चंडीगढच्या पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनंर त्यांनी लंडन येथे एमबीएची पदवी घेतली. केंद्र सरकार आणि ओडिसा सरकारमध्ये त्यांनी महत्वपूर्ण काम केले आहे. संबलपूरचे जिल्हाअधिकारी, अर्थमंत्रालयाचे सचिव, आरोग्य परिवहन, व्यावसायिक करप आदी अर्थविषयक क्षेत्रात त्याचे मोठे योगदान आहे.
शेअर बाजारावर देखरेख ठेवण्यासाठी मोठी जबाबदारी सेबीच्या प्रमुखावर असते. केंद्र सरकारच्या सचिवाएवढेच सेबीच्या प्रमुखाला पगार असतो. 5,62,500 रुपये प्रति महिना असे वेतन पांडे यांना मिळणार आहे. याशिवाय निवासस्थान, गाडी आदींची सुविधा त्यांना सरकारकडून देण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.