TVK chief Vijay faces uncertainty over oath-taking amid unclear majority and reports of Governor’s concern in Tamil Nadu. Sarkarnama
देश

Vijay CM oath delay : राज्यपालांकडे 112 आमदारांच्याच सह्यांचे पत्र, विजय यांचं सत्तेचं गणित बिघडणार?

TVK majority numbers issue : काँग्रेसच्या पाठिंब्यानंतरही आमदारांची संख्या ११२ होते. बहुमतासाठी अजूनही सहा आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.

Rajanand More

Tamil Nadu government formation news : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुपरस्टार विजय हे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या टीव्हीके पक्षाला सर्वाधिक १०८ जागा मिळाल्या आहेत. त्यानुसार त्यांनी आज सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे सादर केला. पण राज्यपाल त्यावर असमाधानी असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे विजय यांचा शपथविधी लांबण्याची शक्यता आहे.

राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा सादर करण्यापूर्वीच तमिळनाडूतील नेहरू स्टेडियमवर विजय यांच्या शपथविधीची तयारी सुरू करण्यात आली आहे. पाच आमदार विजयी झालेल्या काँग्रेसनने आज सकाळी टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर आमदार विजय यांच्या भेटीला गेले.

काँग्रेसच्या आमदारांच्या सह्या घेऊन विजय लोकभवनात गेले होते. राज्यपाल अर्लेकर यांना विजय यांनी ११२ आमदारांच्या सह्यांचे पत्र दिल्याचे समजते. मात्र, बहुमतासाठी ११८ आमदारांची गरज असल्याने विजय यांचा शपथविधी लांबण्याची शक्यता आहे. राज्यपाल ११२ आकड्यावर असमाधानी असल्याची चर्चा आहे.

‘एएनआय’ने सुत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, ‘विजय यांचा उद्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होण्याची शक्यता नाही. त्यांच्याकडे बहुमता सिध्द करण्यासाठी पुरेशी संख्या नाही. त्यावर राज्यपाल समाधानी नाही.’विजय यांच्याकडे १०८ आमदार आहेत. मात्र, विजय दोन जागांवर विजय झाल्याने एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे टीव्हीकेचा आकडा १०७ होतो.

काँग्रेसच्या पाठिंब्यानंतरही आमदारांची संख्या ११२ होते. बहुमतासाठी अजूनही सहा आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. अद्याप काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही पक्षाने विजय यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे विजय यांच्यासमोर बहुमत सिध्द करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे शपथविधीचा सस्पेन्स वाढला आहे.

विजय यांनी राज्यपालांकडे बहुमत सिध्द करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. तोपर्यंत शपथविधी उरकण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, अद्याप राज्यपाल कार्यालयाकडून शपथविधीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. राज्यपाल असमाधानी असल्याबाबत किंवा शपथविधी सोहळ्याबाबत विजय यांच्या पक्षाकडूनही माहिती दिली गेलेली नाही. त्यामुळे  बहुमताचा आकडा जुळणार का, शपथविधी कधी होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT