Twin Tower Demolition Sarkarnama
देश

Twin Tower Demolition नोएडातील ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त

Supertech Twin Tower Demolition टॉवर परिसराचा जवळपास ५०० मीटरचा भाग सील करण्यात आला होता

सरकारनामा ब्युरो

नोएडात अनधिकृतपणे बांधण्यात आलेले भव्य ट्विन टॉवर्स आज अखेर जमीनदोस्त करण्यात आले. टॉवर परिसराचा जवळपास ५०० मीटरचा भाग सील करण्यात आला होता. संबंधित परिसरात पाडकामाशी निगडित अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणालाही प्रवेश नाकारण्यात आला होता.

नोएडाच्या सेक्टर 93 A मध्ये असलेले ट्विन टॉवर आज दुपारी 2.30 वाजता पाडण्यात आले. 3700 किलो स्फोटकांचा वापर करुन या इमारती उद्ध्वस्त करण्यात आल्या. सुपरटेक ट्विन टॉवर्सच्या विध्वंसासाठी अंदाजे 17.55 कोटी रुपये (सुपरटेक ट्विन टॉवर्स डिमॉलिशन कॉस्ट) खर्च करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या दोन टॉवरमध्ये एकूण 950 फ्लॅट बांधण्यात आले होते. ते बांधण्यासाठी सुपरटेक कंपनीने जवळपास 200 ते 300 कोटी रुपये खर्च केले होते.

पाडण्यात आलेले हे ट्विन टॉवर कुतुबमिनारापेक्षाही उचं होते.पण काही क्षणात त्याचा ढिगाऱ्यात रुपांतर झाले. ट्विन टॉवर्स कोसळल्यानंतर धुळीचे लोट उठले आहेत. सुमारे दोन तास धुळीचे ढग हवेत राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आजूबाजूच्या इमारतीतील लोकांनाही हटवण्यात आले आहे. आरोग्य आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तीन रुग्णालयांनाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

भ्रष्टाचाराच्या या गगनचुंबी इमारतीच्या बांधकामाची कहाणी दीड दशकापूर्वी सुरू झाली. नोएडाच्या सेक्टर 93-ए मधील सुपरटेक एमराल्ड कोर्टसाठी 23 नोव्हेंबर 2004 रोजी जमिनीचे वाटप करण्यात आले. या प्रकल्पासाठी नोएडा प्राधिकरणाने सुपरटेकला 84 273 चौरस मीटर जागा दिली होती. 16 मार्च 2005 रोजी त्याचे लीज डीड करण्यात आले होते, परंतु त्यादरम्यान जमिनीच्या मोजमापात दुर्लक्ष झाल्याने अनेक वेळा जमीन वाढली किंवा कमी झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT