Two Arrested from Jalgaon for Nizamuddin Connection
Two Arrested from Jalgaon for Nizamuddin Connection 
देश

निजामुद्दीन कनेक्‍शन : रत्नागिरीच्या दोघांना जळगावात अटक

सरकारनामा ब्युरो

जळगाव : दिल्ली येथे हजरत निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगे जमात या धार्मीक कार्यक्रमाहून परतलेल्या रत्नागिरी येथील दोघांना पिंप्राळा परिसरातून पोलीसांनी अटक केली आहे. तपासणीसाठी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, मूळचे रत्नागिरी येथील दोघजण हे दिल्लीतील निजामुद्दीने येथे पार पडलेल्या तबलिगे जमात येथे कार्यक्रमाला गेले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी हे दोघं आपल्या गावी न जाता ते जळगावात दाखल झाले. त्यानंतर ते दोघ शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या मशिदीजवळ एका खोलीत वास्तव्य करीत होते. याबाबतची गुप्त माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने संपूर्ण परिसरात या दोघांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांना तपासणीसाठी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ओळख लपवून वास्तव्य

संपूर्ण देशभरात दिल्लीच्या निजामुद्दीनचा विषय गंभीर असतांना त्याठिकाणी गेलेल्या प्रत्येकाची ओळख पटविली जात आहे. मात्र शहरात आपली स्वत:ची ओळख लपवित ते दोघ संशयीत गेल्या अनेक दिवसांपासून शहरात राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT