Principal Rupa Reddy Murder Case 
देश

Headmaster Murder: दहावीच्या दोन विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकेला २७ वेळा धारदार शस्त्रानं भोसकलं! 'बाळा' शब्दामुळं हत्येचा झाला उलगडा; थरकाप उडवणारी घटना आली समोर

Headmaster Murder Case: विशेष म्हणजे या खूनाचा उलगडा होत नसताना 'बाळा' या शब्दावरुन पोलिसांनी हल्लेखोरांचा छडा लावला आणि जे सत्य समोर आलं ते पाहून त्यांनाही धक्काच बसला.

Amit Ujagare

Headmaster Murder: एका खासगी शाळेतील मुख्याध्यापिकेवर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला करुन तिला ठार केल्याप्रकरणी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे या खूनाचा उलगडा होत नसताना 'बाळा' या शब्दावरुन पोलिसांनी हल्लेखोरांचा छडा लावला आणि जे सत्य समोर आलं ते पाहून त्यांनाही धक्काच बसला.

तेलंगाणातील नलगोंडा जिल्ह्यातील एका खासगी शाळेतील मुख्याध्यापिका रुपा रेड्डी यांच्यावर २७ वेळा भोसकून हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली होती. ११ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा मुख्याध्यापिका रुपा रेड्डी या घरात एकट्याच होत्या. पण त्यांची हत्या कोणी केली याबाबत पोलिसांना सुरुवातीला काहीच पुरावा हाती लागत नव्हता. पण त्यांनी मुख्याध्यापिकेचा सीडीआर चेक केल्यानंतर शेवटच्या कॉलवरुन पोलिसांना एक खुन्यापर्यंत पोहोचण्याचा एक छोटासा संकेत मिळाला. त्यानंतर पोलिसांनी त्यादिशेन तपास सुरु केल्यानंतर या मुख्याध्यापिकेच्या शाळेतच शिकणाऱ्या दहावीच्या दोन विद्यार्थ्यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं?

मृत मुख्याध्यापिका रुपा रेड्डी या ही घटना घडत असताना फोनवर आपल्या मावशीशी बोलत होत्या, या संभाषणादरम्यान त्यांनी बाबू हा शब्द उच्चारला आणि त्यानंतर लगेचच त्यांचा फोन बंद झाला होता. तेलंगाणात छोट्या विद्यार्थ्यांना किंवा छोट्या मुलांना बाबू असं संबोधलं जातं. याचाच आधार बनवतं पोलिसांनी शाळेचे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांवर आपलं लक्ष्य केंद्रीत केलं. यानंतर पोलिसांच्या तपासाला तेव्हा वेग आला जेव्हा पोलिसांनी पाहिलं की शाळेचे दोन विद्यार्थी अचानक पार्टी करु लागले आहेत, तसंच आपल्या मित्रांसोबत महागड्या गोष्टी घेत आहेत. नलगोंडाचे पोलीस अधीक्षक शरदचंद्र पवार यांनी सांगितलं की, विद्यार्थ्यांच्या या संशयास्पद वायफळ खर्चाचा संशय आल्यानं बुधवारी दोघांना ताब्यात घेण्यात आलं.

नोटांवर मिळाले रक्ताचे डाग

पोलिसांनी एका आरोपी विद्यार्थ्याकडं १.५१ लाख रुपये रोख आणि एक आयफोन जप्त केला. सुरुवातीला या विद्यार्थ्यानं पोलिसांना सांगितलं की, हे पैसे त्याच्या आई-वडिलांनी दिले आहेत. पण फॉरेन्सिक चौकशीत या नोटांवर माणसाच्या रक्ताचे डाग असल्याचं दिसून आलं. यानंतर पोलिसांचा संशय खरा ठरला. पोलिसांनी पुढे केलेल्या तपासात हे निष्पण्ण झालं की, दोन्ही अल्पवयीन आरोपींना दारु पिण्याचं व्यसन जडलं होतं. यांपैकी एका विद्यार्थ्याला कार आणि बाईक चालवण्याचा आवड होती. त्यासाठी तो लवकरात लवकर खूप पैसा कमवू इच्छित होता. हत्येपूर्वी सुमारे १५ दिवस आधी त्यानं मुख्याध्यापिका आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या स्कूलबॅगमधून एक मोबाईल आणि काही रोख रक्कम पकडली होती. यावरुन मुख्याध्यापिका त्याला ओरडल्या होत्या. हॉस्टेलवरुनही त्याला काढून टाकण्यात आलं होतं. त्याच्या पालकांना देखील याबाबत सांगण्यात आलं होतं. याचा बदला घेण्यासाठी आणि पैशांच्या हव्यासापोटी त्यानं चोरी करण्याचा प्लॅन बनवला. त्याला वाटलं की, ११ ऑगस्टला शाळेत मोठ्या प्रमाणावर फी जमा झाल्यामुळं मुख्याध्यापिकेच्या घरी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम असेल.

रेकी करुन केला होता प्लॅन

घटनेच्या पाच दिवस आधी या दोन्ही विद्यार्थ्यांनी धारदार शस्त्रांची खरेदी केली होती. पकडलं जाण्यापासून वाचण्यासाठी त्यांनी या भागातील सीसीटीव्ही कॅमेरॅंची देखील रेकी केली होती. ११ ऑगस्ट रोजी एक विद्यार्थी घराची सीमाभिंत ओलांडून घरात घुसला तर दुसरा बाहेर पहारा देत होता. घरात शिरलेला विद्यार्थी जेव्हा पैसे शोधत होता त्याचक्षणी फोनवर बोलत असलेल्या मुख्याध्यापिका रुपा रेड्डी यांनी त्याला पाहिलं आणि पकडल्या जाण्याच्या भितीनं हातातल्या धारदार चाकून २७ वार करुन हत्या केली. खून केल्यानंतर त्यानं पुरावे नष्ट करण्यासाठी रक्तानं माखलेले कपडे एका नाल्यामध्ये टाकून दिले. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना बाल न्याय बोर्डासमोर सादर केलं त्यानंतर त्याला रिमांड होममध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT