सिवनी : मध्यप्रदेशच्या (Madhya-Pradesh) सिवनी जिल्ह्यात मॉब लिंचींगची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिवनी जिल्ह्यातील कुरई पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या बादल पार जवळ ३ आदिवासींना गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन लाठ्या-काठ्यांच्या साहाय्याने बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, काँग्रेसने बजरंग दलावर या मारहाणीचा आरोप केला आहे. तर पोलिसांनी या घटनेशी संबंधित २० पेक्षा अधिक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, ९ जणांना अटक केली आहे.
अतिरिक्त पोलिस अधिक्षक एस.के. मरावी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला १५-२० जणांचा समुह पिडीत कुटुंबाच्या घरी चालून गेला. या जमावाने कुटुंबाकडे गोमांस बाळगल्याचा आरोप करत लाठ्या-काठ्यांनी तिघांना बेदम मारहाण केली. यात रुग्णालयात नेताना दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. कुरई पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. पिडीत कुटुंबाकडे तब्बल १२ किलो मांस जप्त करण्यात आले आहे.
घटनेत जखमी झालेल्या बृजेश बत्ती यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले की, मी जेव्हा घटनास्थळी गेलो तेव्हा सागर निवासी संपत बत्ती आणि सिमरिया निवासी ढांसा यांना लाठ्या-काठ्यांच्या सहाय्याने मारहाण सुरु होती. घटनेचा निषेध करताना काँग्रेस आमदार काकोदिया यांनी या हल्ल्यात बजरंग दलाचा हात असल्याचा आरोप करत दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच पिडीत कुटुंबाला त्वरित १-१ कोटी रुपये आणि सरकारी नोकरी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान या घटनेवर बोलताना म्हणाल्या, बजरंग दलाच्या लोकांनी ३ आदिवासींना गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन लाठ्या-काठ्यांच्या साहाय्याने बेदम मारहाण केली आहे. आरएसएस-भाजपचा संविधान आणि दलित-आदिवासि विरोधी अजेंडा आदिवांसीच्या विरुद्ध हिंसेला चालना देत आहे. आपल्याला या विरोधात एकजूट होवून हा अजेंडा रोखण्याची गरज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.