Supreme Court Hearing Sarkarnama
देश

Supreme Court Live : सगळे निर्णय आमच्या बाजूने लागले; ठाकरे गटाचे वकील सिंघवींचा मोठा दावा...

SC Final Decision Shiv Sena Controversy : न्यायालयाच्या निकालात ठाकरेंचा राजीनामा ठरला कळीचा मुद्दा

सरकारनामा ब्यूरो

SC Decision on Shiv Sena : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज (ता. ११) जाहीर झाला. यामध्ये न्यायालयाने निर्णय देताना म्हटले की ''तत्काली नराज्यपाल भतसिंह कोश्यारी यांच्याकडे बहुमत चाचणी बोलवण्यासाठी कोणतेही योग्य कागदपत्रे नव्हती. त्यामुळे राज्यापालांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमताच्या चाचणीचे आदेश दिले हे बेकायदेशीह होते, अशा शब्दांत राज्यपालांच्या भूमिकेवर न्यायालयाने ताशेरे ओढले. त्यावर ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

राज्यापालांची कृती ही बेकायदेशीर होती, असेही न्यायालयाने म्हटले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी व्हिप म्हणून जी भरत गोगावले यांची नियुक्ती केली होती, ती सुद्दा न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला, यावर बोलताना अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, निकाल आमच्या बाजूने आलेले आहेत.

न्यायालयाने सांगितले की ''न्यायालयाने शिंदे यांनी भरत गोगावले यांची जी नियुक्ती केली होती ती बेकायदेशीर ठरवली आहे. तसेच राज्यपालानी जी बहुमच चाचणी बोलावली ती चुकीची होती. तसेच ४० आमदारांचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. मात्र, त्यांनी आता या प्रकरणावर तात्काळ निर्णय घ्यावा. त्याच प्रमाणे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांना परत त्या पदावर बसवणे शक्य नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे, असे सिंघवी यांनी सांगितले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड करत गुवाहाटी गाठले आणि तेथून महाराष्ट्रात परत येत सरकार स्थापन केले. दरम्यानच्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या. शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाने 16 आमदारांना व्हिप पाळला नाही, म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या आमदारांना नोटीस बजावली होती. त्या नोटिशीच्या विरोधात १६ आमदार सर्वोच्च न्यायालयात गेले होते, त्यावरचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT