Uddhav Thackeray Sarkarnama
देश

Uddhav Thackeray: INDIA आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे बरसले! काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत दिला महत्वाचा सल्ला

India Alliance Meeting : इंडिया आघाडीची आज बैठक पार पडली या बैठकीत घटकपक्ष असलेल्या शिवसेना युबीटी पक्षानं काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर काही आक्षेप नोंदवले आहेत.

Amit Ujagare

Uddhav Thackeray: इंडिया आघाडीच्या आज पार पडलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे हे चांगलेच बरसलेले पाहायला मिळाले. प्रामुख्यानं काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर त्यांनी काही आक्षेप नोंदवले आहेत. यामध्ये त्यांनी राज्यात काँग्रेसकडून एकट्यानेच काही गोष्टी केल्या जात आहेत, यामध्ये आघाडीतील घटकपक्षांना विचारात घेतलं जात नसल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे. त्याचबरोबर इतरही अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं आहे. दिल्लीच्या कॉस्टिट्युशन क्लबमध्ये आज (३० सप्टेंबर) ही बैठक पार पडली.

बैठकीत नेमकं काय घडलं?

देशपातळीवर सध्या अनेक राजकीय मुद्दे गाजत आहेत. यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा विषय हा ऐरणीवर आला आहे. यामध्ये काँग्रेस या प्रमुख विरोधीपक्षाकडून आयुक्तांच्या राजीनाम्यासह निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यासाठी नुकतंच काँग्रेसनं राज्यात आंदोलनही केलं. पण या मुद्द्याविरोधात विरोधक म्हणून इंडिया आघाडीतील सर्वच घटकपक्षांनी एकत्रितपणे आवाज उठवला पाहिजे. काँग्रेसचा एकला चलो चा नारा चालणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला.

दरम्यान, मुंबईत आझाद मैदानात कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीनं ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलकांसोबत शिवसेना आणि मनसेकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. त्यामुळं ठाकरेंनी अशा पद्धतीनं कॉक्रोच जनता पार्टीसोबत आंदोलन करावं का? हा प्रश्न विचारला जात होता. पण इंडिया आघाडीच्या बैठकीत उलट ठाकरेंनीच काँग्रेसच्या एकला चलो कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवल्याची माहिती कळते आहे.

त्यामुळं आता यापुढे इंडिया आघाडीच्यावतीनं एकत्रितपणे आंदोलन केली जातात का? तसंच यापुढील काळात विरोधकांच्या आंदोलनाची धार अधिक वाढत जाईल याकडं आता सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळं इंडिया आघाडीची बैठक संपल्यानंतर त्यामध्ये कुठल्या मुद्द्यांवर पुढील काळात मुद्दे उपस्थित केले जातील आणि सरकारला प्रश्न विचारले जातील याबाबत स्पष्टता येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT