UGC NET Sarkarnama
देश

Video UGC NET : अखेर UGC NET परीक्षा रद्द, गैरव्यवहार प्रकरणात सरकारचा मोठा निर्णय

UGC NET Exam Cancelled : यूजीसी 'नेट' परीक्षेचं पावित्र्य राखण्यासाठी परीक्षा पुन्हा घेत असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Jagdish Patil

UGC NET Exam Cancelled : देशभरात 'नेट'च्या परीक्षेत गोंधळ निर्माण झाला होता. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयानुसार आता यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात येणार आहे. शिवाय या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार असून जून सत्रात झालेली परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे.

देशभरातील विद्यार्थ्यांचा रोष आणि विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर आता नेटच्या परीक्षेबाबत केंद्र सरकारने सावध पवित्रा घेतल्याचं दिसत आहे. तर यूजीसी नेट परीक्षेचं पावित्र्य राखण्यासाठी परीक्षा पुन्हा घेत असल्याच केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, परीक्षा प्रक्रियेची उच्च पातळीची पारदर्शकता आणि पावित्र्य सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने UGC-NET जून 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा पुन्हा घेतली जाईल, याबाबतची माहिती स्वतंत्रपणे दिली जाईल. यासोबतच हे प्रकरण सखोल तपासासाठी सीबीआयकडे सोपवलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT