Ukraine Crisis  
देश

Ukraine Crisis मातृभुमीच्या रक्षणासाठी परदेशातून युक्रेनियन तरुण कीवमध्ये दाखल

Ukraine Crisis युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा आज (२७ फेब्रुवारी) चौथा दिवस आहे.

सरकारनामा ब्युरो

कीव: युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा आज (२७ फेब्रुवारी) चौथा दिवस आहे. युक्रेनच्या बऱ्याचशा भुभागावर कब्जा मिळवल्यानंतर आता रशियन सैन्याने खारकिव आणि सुमीसह अनेक प्रमुख शहरांमध्ये प्रवेश केला आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव जवळ पोहोचले आहे. दुसरीकडे, युद्धाच्या भीषणतेचा सामना करणाऱ्या युक्रेनमधून नागरिकांचे पलायन सुरूच आहे. युक्रेनमधून आतापर्यंत दोन लाख नागरिकांनी पलायन केल्याचे संयुक्त राष्ट्र निर्वासित संस्थेने म्हटले आहे.

विशेष म्हणजे, युक्रेनमधून नागरिकांच्या पलायनाच्या बातम्यांदरम्यान परदेशातील युक्रेनियन नागरिकही आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी मायदेशी परतत आहेत. राष्ट्राध्यक्ष वोल्डोयोमीर झेलेन्स्की यांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वसामान्य नागरिकांनीही पुढे येण्याचे आवाहन केले. झेलेन्स्कीचे हे आवाहन आता सार्थ होताना दिसत आहे. रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनच्या सैन्यात सामील होण्यासाठी कीवच्या एका भागात मोठ्या संख्येने नागरिक दाखल झाले आहेत.

सैन्यात भरती होण्यासाठी कीवमध्ये दाखल झालेल्या सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या संख्येने माजी सैनिक आहेत. युक्रेनचे दिग्गज सैनिक राष्ट्राच्या रक्षणासाठी पुन्हा सैन्यात सामील होण्यास तयार आहेत. युक्रेनच्या युद्धाच्या काळात सैन्यात सामील होण्यासाठी आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी परदेशातून मोठ्या संख्येने नागरिक मायदेशी परतले आहेत.

पोलंडहून परतलेल्या एका तरुणाने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मी तिथे व्यवसाय करतो. माझ्या देशाचे रक्षण करण्यासाठी मी मायदेशी परतलो आहे. व्यवसायाने वास्तुविशारद असलेल्या आणखी एका तरुणाने सांगितले की, तो आपल्या देशाचे रशियन हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी सैन्यात भरती होण्यासाठी आला आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून थेट सैन्यात भरती होण्यासाठी इतर अनेक तरुण मायदेश युक्रेनमध्ये परतताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे, युक्रेन सरकारने 18 ते 60 वर्षे लोकांना देश सोडण्यास बंदी घातली होती. युद्धादरम्यान युक्रेन सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना रशियन सैन्यावर घरातून पेट्रोल बॉम्ब टाकून हल्ला करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. युक्रेनमधील सामान्य नागरिकांची रशियाविरुद्धची भूमिका पुतीन यांची चिंता वाढवत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT